महिला दिनानिमित्त पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्री सासुबाई व सुनबाई च्या हस्ते शुभारंभ.

youtube

महिला दिनानिमित्त पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्री सासुबाई व सुनबाई च्या हस्ते शुभारंभ

अहमदनगर, ता.५ :
समाजातील प्रत्येक व्यक्ती आर्थिक,मानसिक, वैचारिक, शारीरिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावी या हेतूने नागेबाबा परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या प्रकाशनाचे प्रेरणादायी व सकारात्मक विचार असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन अहमदनगर शहरातील झोपडी कँन्टीन जवळील नागेबाबा संस्थेच्या कॉर्पोरेट प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापुन संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उदघाटन उद्योजिका सपना सुसे/कानडे व सविता कानडे,(जागतिक आरोग्य सल्लागार) या सून व सासूबाई यांच्या हस्ते सोमवार दि.६ मार्च सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी संपन्न झाला. आहे.प्रदर्शनात उपलब्ध असलेली नामांकित प्रकाशनाची पुस्तके प्रत्येकी केवळ शंभर रुपयात उपलब्ध अशी पहावयास मिळाले.महीला व नागरकरांनी या सुवर्णसंधीचा आवश्य लाभ घेतला , या कार्यक्रम ला उपस्थित मान्यवर सपना सुसे,सविता कानडे ,किरण कानडे सविता नवले, सुनीता गोरे, सौ.शोभा जाधव, श्रीमती भिमाबाई कानडे स्वाती गुंदेचा, भामरे मॅडम व महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थित ती होती व नागेबाबा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष कडुभाऊ काळे सर्व मान्यवराचे आभार मानले .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!