मूलभूत संघर्ष समितीच्या तालुका अध्यक्ष पदी संदेश कांबळे यांची निवड.

youtube

मूलभूत संघर्ष समितीच्या तालुका अध्यक्ष पदी संदेश कांबळे यांची निवड

उमरखेड

-:मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या उमरखेड तालुका अध्यक्ष पदी संदेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य उपाध्यक्ष प्रशांत खंदारे,विदर्भ प्रभारी राजू गायकवाड व समितीचे जिल्हा सदस्य यांच्या उपस्थितीत समितीची पुसद येथील रेस्ट हाऊस मध्ये बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत उमरखेड तालुका अध्यक्ष पदी एकमताने संदेश कांबळे यांची निवड करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठा,योग्यता समाजाप्रती असलेली तळमळ व पत्रकारिता क्षेत्रात असलेलं योगदान ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे राज्य उपाध्यक्ष खंदारे यांनी सांगितले.

चौकट-:
सामाजिक बांधिलकी जपून समाजातील गोरगरीब लोकांना समितीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील
संदेश कांबळे
उमरखेड तालुका अध्यक्ष
मूलभूत अधिकार संघर्ष समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!