धानोरा साचले देव येथील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट.

youtube

धानोरा साचले देव येथील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट

धानोरा –

धानोरा येथील जे साचले देव येथील काम अतिशय निकृष्ठ
दर्जाचे होत असून या कामाची दखल गुण नियंत्रण कक्षाने घेण्याची गरज आहे. सदर कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारचे लक्ष ठेवून नसून त्यांना वारंवार या कामाचे इस्टिमेट मागितले. असता त्यांनी ती दिली नाही. सदर कामाचे अंतर किती आहे. काम कोणत्या कंपनीला दिले. आहे, कोणत्या फंडामधून काम आहे ,कळायला मार्ग नाही, कोणत्याही प्रकारचा कामाचा बोर्ड या रस्त्यावर लावले नसून जुना रोड आहे, त्याच रोडवर दगड टाकून काम चालू आहे, असं न करता तो रस्ता अगोदर उखडून नंतर दगड टाकायला पाहिजे होता, असं नागरिकांमध्ये बोले जात आहे आणि त्या कामाचा बोर्ड सदर कामावर लावणे गरजेचे आहे, मागील एका वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे विशेष म्हणजे दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक एक वर्ष लागत आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड यांच्या कामावर नागरिकांची नाराजी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!