बस जळीत प्रकरणातील आरोपी जेरबंद – मराठवाड्यातील हदगाव येथून तिघांना अटक : तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी.

बस जळीत प्रकरणातील आरोपी जेरबंद – मराठवाड्यातील हदगाव येथून तिघांना अटक : तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी.

youtube

बस जळीत प्रकरणातील आरोपी जेरबंद

– मराठवाड्यातील हदगाव येथून तिघांना अटक : तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी

उमरखेड : शहर प्रतिनिधी नांदेडवरून नागपूरकडे
जाणारी बस 27 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान गोजेगाव जवळील पैनगंगा नदी पुलाजवळ अडवून तोडफोड करण्यात आली व नंतर बस जाळण्यात आली होती. ही घटना २७ ऑक्टोबरला घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मराठवाड्यातील हदगाव येथून तीन आरोपींना अटक केली.
सदर घटनेमधील आकाश हुलकाने (२३), शिवराज कदम (२५) आणि चेतन राठोड (२५, तिघेही रा. हदगाव, जि. नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना तब्बल २८ दिवसांनी अटक करून
न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. २७ ऑक्टोबरला नांदेडवरून नागपूरकरिता निघालेली बस रात्री ११:०० वाजताच्या सुमारास तालुक्यातील गोजेगावजवळ पोहोचली. पैनगंगा पुलाजवळ बस आली असताना दुचाकीस्वारांनी दुचाकी आडवी लावून बस थांबविली. नंतर पाठीमागून आलेल्या पाच ते सहा इसमांनी बसच्या काचा फोडल्या. टायरवर पेट्रोल टाकून आग लावली. या आगीत बस खाक झाली होती.
बसचे सुमारे ३२ लाखांचे नुकसान
झाल्याची तक्रार बसचालक बी.डी. नाईकवाडे यांनी दिली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, ४२७, ३४१, ३३६, आरडब्ल्यू ३ नुसार गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला होता.
तपासात आरोपी हदगाव येथे आहे, अशी माहिती मिळाल्यावरून ठाणेदार शंकर पांचाळ, पीएसआय किशोर घोडेस्वार यांनी शुक्रवारी पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास हदगाव येथे जाऊन तीन आरोपींना अटक केली त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!
WhatsApp Group