माजी आमदार समन्वय समितीच्या विभागीय अध्यक्ष पदी प्रकाश पाटील देवसरकर यांची नियुक्ती

youtube

माजी आमदार समन्वय समितीच्या विभागीय अध्यक्ष पदी प्रकाश पाटील देवसरकर यांची नियुक्ती

उमरखेड –
महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समितीच्या अमरावती विभागीय अध्यक्ष पदी उमरखेड येथील माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची नियुक्ती सलग पाच वर्षासाठी झाली आहे
या समितीच्या माध्यमातून अमरावती विभागातील तसेच राज्यातील माजी आमदार यांच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक केली जाते , सदरील समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सुधाकर गनगणे असून अध्यक्ष माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी लेखी पत्र देऊन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांची १५ जुलै रोजी पासून पुढील पाच वर्षा साठी नियुक्ती केली आहे
समितीने आपल्यावर जो विश्वास ठेवून जी जबाबदारी दिली या संधीचे आपण सोण करू अधिक जोमाने माजी आमदार यांच्या विविध प्रकारचे प्रश्न सोडविण्याचे काम करू असे मत नवनियुक्त अध्यक्ष माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी व्यक्त केले

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!