प्रतिबंधित तंबाखूसह एकूण ७ लाखाचा मुद्देमाल जप्त  [बिटरगांव पोलीस स्टेशनची धडक कारवाई.]

youtube
  1. प्रतिबंधित तंबाखूसह एकूण ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

[बिटरगांव पोलीस स्टेशनची धडक कारवाई.]

ढाणकी / प्रतिनिधी :

नुकतेच महाराष्ट्र शासनाने २० जुलै २०२४ पासून , राज्यात गुटखा/ सुगंधी तंबाखू पदार्थाचे उत्पादन , साठा , वितरण , वाहतूक व विक्रीस निर्बंध घातला असून, यवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत या विरोधात मोहीम राबविल्या जात असून, दिनांक १३ डिसेंबर रोजी, रात्री दरम्यान बिटरगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून , महिंद्रा ऑटो क्रमांक एम एच ०३ ए एच ७६३६ मधून, सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक होत असताना, बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सापळा रचून सोईट ते ढाणकी रोडवर, पिवळ्या रंगाचा मालवाहू ऑटो सोईट कडून ढाणकीकडे येत असताना, त्यास थांबवून पंचा समक्ष, अल्फा महिंद्रा ऑटो चालकास नाव तोफिक खान फकीर खान वय ३५ राहणार जामा मस्जीद वार्ड उमरखेड व त्याच्या ताब्यातील सदर तीन चाकी अल्फा महिंद्रा आणि वाहनांमध्ये राजश्री परंपरा, एक पिवळ्या सिल्वर रंगाचे राजश्री परंपरा सुगंधी तंबाखूचे १८ बॉक्समध्ये ९०० पॅकेट किंमत अंदाजे ५ लाख ४० हजार व अवैध वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला अल्फा महिंद्रा ऑटो किंमत अंदाजे १६०००० असा एकूण ७ लाख रुपयाचा मुद्देमाल, विनापरवाना व प्रतीबंधीत असलेला जर्दा, तंबाखू विक्रीकरिता बाळगून असताना मिळून आला. तो जप्त करून आरोपी विरुद्ध , २०२४ कलम २७३,२७४, २७५, १२३, ३(५) BNS सहकलम ५९ अन्न व सुरक्षा व मानदे कायदा सन २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६(२) कलम २७, कलम ३०(२)(अ), कलम ५९ नुसार कार्यवाही करण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती.
सदर कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री रजनीकांत उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात, ठाणेदार संतोष मनवर, पुरवठा निरीक्षक अमित कुमार उपलप अन्नसुरक्षा अधिकारी अन्न व प्रशासन यवतमाळ, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे, पो. हे.कॉ. रवी गीते, पो. ना. देविदास हाके,पोकॉ. निलेश भालेराव, बालाजी मस्के व प्रवीण जाधव यांनी केली.
पुढील तपास पो.उप.नि. शिवाजी टिपुर्णे हे करीत आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!