व्हॉइस ऑफ मीडिया राज्य महासचिव पदी रेणुका कोटंबकर यांची नियुक्ती

youtube

व्हॉइस ऑफ मीडिया राज्य महासचिव पदी रेणुका कोटंबकर यांची नियुक्ती

वर्धा प्रतिनिधी:

देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना म्हणून नावारूपास आलेली व्हॉइस ऑफ मीडिया अल्पावधीतच देशाबाहेरही पोहोचली आहे. या संघटनेच्या अंतर्गत महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र विंगची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये रेणुका कोटंबकर यांची राज्य महासचिव पदी निवड करण्यात आली आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया हे महिला पत्रकारांसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे. ग्रामीण व शहरी भागातील तळागाळातील महिला पत्रकार या संघटनेमध्ये सामील होऊन पत्रकारांसाठीच्या पंचसूत्री मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत.

या वेळी रेणुका म्हणाल्या की प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत दिसत आहे तरीपण “पत्रकारिता क्षेत्रामध्ये महिला संख्या खूपच कमी आहे म्हणून महिलांनी पत्रकारिता या क्षेत्रात येऊन लोकशाही च्या चौथ्या आधार स्तंभाला अजून बळकट करण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील महिला पत्रकारांनी या संघटनेमध्ये सहभागी व्हावे. ही संघटना केवळ महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र विंग असलेली असून, पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना आहे.
या निवडीसाठी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी व प्र.सविता चंद्रे यांच्या मार्गदर्शन स्तव ही निवड करण्यात आली.राज्य महासचिव पदी रेणुका कोटंबकर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!