उमरखेड येथे डायलिसिस सेंटरचे उद्‌घाटन — रुग्णांना मोठा दिलासा उमरखेड

youtube

उमरखेड येथे डायलिसिस सेंटरचे उद्‌घाटन — रुग्णांना मोठा दिलासा

उमरखेड : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर उमरखेड शहरात अत्याधुनिक डायलिसिस सेंटर सुरू झाले असून, त्यामुळे मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या केंद्राचे उद्‌घाटन उमरखेडचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार किसणराव वानखेडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “उमरखेड सारख्या ग्रामीण भागात डायलिसिसची सोय उपलब्ध झाल्याने रुग्णांना आता नांदेड किंवा यवतमाळला जावे लागणार नाही. शासनाच्या आरोग्य योजनांमुळे ही सुविधा सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात मिळणार आहे.”
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे नेते नितीन भुतडा माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, निवाशी वैधकीय अधिकारी डॉ रमेश मांडण, उमरखेड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, शहर अध्यक्ष अँड संजीव कुमार जाधव डॉ . संभाजी डोंगे, डॉ किशोर राठोड, चंदा डोंगे ,डॉ अभय विरखडे ,डोंगे मँडम,डॉ रितेश कलमुरगे, डॉ नितीन ॲक्यमवार, डॉ धनजय मोरे ,डॉ माधूरी तायडे, डॉ अभिजित गोरे, डॉ प्रदिप शिन्दे ,डॉ स्वप्निल जिवने, डॉ अजमत जागीरदार ,डॉ शारदा लांभाटे डॉ राजेश रावते ,डॉ ज्योती जाधव, अनिल नरवाडे, कपिल पाटील चव्हाण, कैलास कदम, रवी रुडे , गजानन सोळंके,व हाँसस्पिटल चा सर्व स्टाँप व पत्रकार उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईशांत गरवारे
यांनी केले तर सूत्रसंचालन वैशाली धोंगडे आभार डॉ संभाजी डोंगे यांनी मानले.

Google Ad
Google Ad

2 thoughts on “उमरखेड येथे डायलिसिस सेंटरचे उद्‌घाटन — रुग्णांना मोठा दिलासा उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!