परिसरातील रुग्णांना आता दर्जेदार उपचार मिळणार उमरखेड येथे रुग्णांसाठी आधुनिक ‘श्री श्री हॉस्पिटल’ सुरु
परिसरातील रुग्णांना आता दर्जेदार उपचार मिळणार
उमरखेड येथे रुग्णांसाठी आधुनिक ‘श्री श्री हॉस्पिटल’ सुरु
उमरखेड : शहरातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून यूथ फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विवेक पत्रे यांनी पुसद रोड महाराष्ट्र बॅके जवळ आधुनिक मेडीकल उपकरणा ने सज्ज ‘श्री श्री हॉस्पिटल’ सुरू झाले आहे . या व्दारे परिसरातील ग्रामिण भागातील रुग्णांना मोठ्या शहराकडे जाण्या ऐवजी शहरातच दर्जेदार उपचार मिळतील . या रुग्णालया चा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. कार्यक्रमाला समाजातील विविध घटकांतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या हॉस्पिटलचे उद्घाटन डॉ. पत्रे यांचे आई वडिल माया पत्रे व नामदेवराव पत्रे यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सामाजिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, व्यापारी, शासकीय कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना बहु संख्येने उपस्थित होते.
डॉ. विवेक पत्रे हे कुशल वैद्यकीय तज्ज्ञ असून समाजसेवेच्या क्षेत्रातही ते अग्रस्थानी आहेत. त्यांनी अनेक वर्षांपासून निस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य केले आहे. अनाथ मुलांना कपड्यांची मदत करणे, गरजूंना कमी खर्चात उपचार उपलब्ध करून देणे असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. रुग्णालयात पण ते गरजुना सवलत देतात .
‘श्री श्री हॉस्पिटल’मध्ये आधुनिक आरोग्य सुविधांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्याधुनिक आयसीयू, जनरल वॉर्ड, प्रगत यंत्रसामग्री तसेच विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा येथे उपलब्ध असून परिसरातील रुग्णांना आता दर्जेदार उपचार स्थानिक पातळीवर मिळणार आहेत.
फोटो




66b có mục “Top slot tuần” – cập nhật những game được yêu thích nhất, giúp bạn không bỏ lỡ xu hướng. TONY05-09