डॉ. लीना चितलांगे यांचे आहार विषयक मार्गदर्शन.
डॉ. लीना चितलांगे यांचे आहार विषयक मार्गदर्शन…..
उमरखेड :
येथील इनरव्हिल क्लबच्या वतीने शहीद भगतसिंग उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत इनरव्हील क्लब व जेष्ठ नागरिक महिला मंडळातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हनून डॉ.लीना चितलांगे मॅडम यांना आमंत्रित केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आहार विषयक मार्गदर्शन केले व ॲनिमिया च्या धोक्यापासून दूर राहण्याकरता कशाप्रकारे आहार घ्यायला पाहिजे याचे मार्गदर्शन केले. तसेच प्राणायाम योगासने याचे महत्त्व पटवून दिले व
मुलांना
स्वच्छतेचे महत्व पटवून दिले,यावेळी प्रतिभा मालपे यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले जेणेकरून मुलांना हात धुण्याची सवय लागेल. यावेळी
इनर विल च्या सदस्य सौ. जया देशमुख यांनी गरजू मुलीला वाकर,व सर्व मुलांना डेटॉल साबण, नेलकटर, नॅपकिन
इत्यादी वस्तूंचे वाटप केले. प्राध्यापक जय माला लाडेयांनी गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. शीला कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या चार्टर्ड प्रेसिडेंट सौ. विमल राऊत, कुसुम गिरी मुख्याध्यापक विजय सूर्यवंशी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. तसेच इनरव्हील क्लबच्या व जेष्ठ नागरिक महिला मंडळ सदस्या उपस्थित होत्या व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!