मातृभुमी ची सेवा पूर्ण करून मेजर संभाजी यांचे औदुंबर नगरीत धुमधडाक्यात स्वागत.

youtube

मातृभूमीची सेवा पूर्ण करून जन्मभूमीत आलेल्या मेजर संभाजी यांचे औदुंबर नगरीत जंगी स्वागत

उमरखेड प्रतिनिधी ..

देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर मेहनत घेऊन सन१९९९ मध्ये भारतीय सैन्यदलात भरती होऊन २३ वर्ष अति दुर्गम भागात भारत मातेची निष्ठापूर्वक सेवा पूर्ण करून सेवानिवृत्तीनंतर आपल्या जन्मभूमी मध्ये परतलेल्या मेजर संभाजी मल्हारी पाईकराव यांचे दिनांक १ मे२०२२ रोजी जंगी स्वागत करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, मेजर संभाजी यांना भारतीय सैन्य दला विषयी विशेष आकर्षण होते आणि यातूनच यांची सैन्य दलात भरती होण्याची धडपड सुरू झाली. सतत प्रयत्न करून सन १९९९ मध्ये त्यांची सैन्यदलात भरती झाली. मध्यप्रदेशातील सागर येथील महार रेजिमेंटच्या मुख्य केंद्रात यांनी अत्यंत कठीण असे प्रशिक्षण कठोर परिश्रम घेऊन यशस्वीरित्या पूर्ण केले. सैन्यदलात कार्यरत असताना भारत देशातील अनेक राज्यात तसेच अतिदुर्गम भागात मेजर संभाजी यांनी अत्यंत निष्ठापूर्वक, इमानदारीने २३ वर्षे भारतमातेची सेवा पूर्ण करून जम्मू कश्मीर मधील राजुर येथून मेजर संभाजी मल्हारी पाईकराव हे सेवानिवृत्त होऊन दिनांक १ मे२०२२ रोजी आपल्या जन्मभूमीत परत आलेत त्या प्रित्यर्थ भारतीय माजी सैनिक संघटना तालुका उमरखेड, भारतीय विद्यार्थी मोर्चा, बामसेफ प्रणित भारत मुक्ती मोर्चा,, रिपब्लिकन सेना, भिम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी क्रांती मोर्चा यासह अनेक संघटनांनी संभाजी पाईकराव यांचे जंगी स्वागत केले. या स्वागत सोहळ्यामुळे मी व माझे कुटुंब भारावून गेलो आहोत असे मेजर संभाजी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून सर्वांचे आभार मानून मी सदैव आपला ऋणी राहील अशा भावना व्यक्त केल्या. माजी सैनिक मुनेश्वर यांनी देशभक्तीपर क्रांतिकारी गीत गायन करून संपूर्ण वातावरण देशभक्तीमय केले. यानिमित्ताने उपस्थितांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.
याप्रसंगी भारतीय माजी सैनिक संघटना उमरखेड तालुका अध्यक्ष श्री. विवेकजी मुडे सर, माजी सैनिक जनार्धन साळवे, मिलिंद बरडे, लक्ष्मीकांत पिंपरखेडे, नितीन जाधव, संजय मोहिते यांच्या सह अनेक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद उत्साहाचे वातावरणात सदर कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी सैनिकांविषयी त्यांच्या अनुशासनयुक्त जीवनाविषयी कृतज्ञता व्यक्त करून असे म्हणावे वाटते की,. “देशासाठी लढणाऱ्या वीरांनो देशाला तुमचा अभिमान आहे,
तुमच्या सळसळत्या रक्ता मध्येच देशाचा साठलेला स्वाभिमान आहे.”

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!