माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांना 50% सवलतीत शिलाई मशीन वाटप.

youtube

माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त महीलांना 50% सवलतीत शिलाई मशीन वाटप

उमरखेड..
१ एप्रिल २०२२ रोजी माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या विशेष उपस्थितीत तालुक्यातील सर्व गरजू माता-भगिनींना 50 टक्के सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप कार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद मंगल कार्यालय येथे करण्यात आले.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिमाचे पुजन आमदार इंद्रनील नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महिला नी सक्षम होने व आपल्या स्वबळावर उभे राहने असे आमदार नाईक यांनी मटले.व
इंद्रनील नाईक यांनी येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला घवघवीत यश मिळणार आहे असे प्रतिपादन केले.
शिलाई मशीन व गिरणी त्या माध्यमातून माता-भगिनीना सुद्धा स्वयंरोजगार उपलब्ध होईल तसेच युवकांनी व युवतीना समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन गरजूंना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या माध्यमातून आधार देत रहावा असे आमदार इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष भिमराव पाटील चंद्रवाशी, प्रेमराव हनवते, शंकरराव तलांगकर, देविदास खोकले, राजूभैय्या जयस्वाल, वि ना कदम सर, डॉ संभाराव कदम, मिथीलेश जयस्वाल, साजिद जहागीरदार,यासिन भाई,बबलू जाधव पाटील,रहेमत जहागीरदार,आशाताई देवसरकर,स्वाती पाचकोरे,गुणवंत सूर्यवंशी, स्वप्नील कनवाळे, अविनाश वानखेडे,ब्रम्हानंद यादवकुळे, अमोल चांद्रवांशी, आकाश माने, मंगेश यादवकुळे,झाकीर राज,रोहित हेलगंड,पवन कदम,संतोष सूर्यवंशी,सूरज देशमुख,अविनाश यादवकुळे, बबलू भाई, राजरत्न नगराळे, व असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सूर्यवंशी तर सूत्रसंचालन बबलू जाधव पाटील यांनी केले व आभार सूरज देशमुख यांनी केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!