राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड तालुका अध्यक्षपदी बबलू जाधव तर शहर अध्यक्षपदी संतोष सूर्यवंशी.

youtube

राष्ट्रवादी युवक काँग्रेस उमरखेड तालुका अध्यक्षपदी बबलू जाधव तर शहराध्यक्ष पदी संतोष सूर्यवंशी यांची निवड

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

उमरखेड प्रतिनिधी/ : सविता चंद्रे
आमदार इंद्रनील नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर यांच्या उपस्थितीत बबलू उर्फ बंटी जाधव पाटील यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उमरखेड तालुकाध्यक्ष पदी तर संतोष पाटील सूर्यवंशी यांची उमरखेड शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
दोन्ही तरुन युवकांचे अभिनंदन यावेळी करण्यातआले असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे अशी अपेक्षा यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांनी बोलून दाखवली. तर येणाऱ्या काळामध्ये उमरखेड तालुक्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या नेतृत्वामध्ये मोठ्या जोमाने काम करून येणाऱ्या काळामध्ये सर्व स्तरावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवाल ही अपेक्षा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांनी व्यक्त केली.
पदाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा आशावाद नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!