वंचित बहुजन आघाडी उमरखेड तर्फे भीम जयंती महोत्सव 2023 उमरखेड मध्ये थाटामाटात साजरा.

youtube

वंचित बहुजन आघाडी उमरखेड तर्फे भीम जयंती महोत्सव 2023 उमरखेड मध्ये थाटामाटात साजरा

उमरखेड:-
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यातील संपूर्ण तालुका व जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 132 व्या जयंतीनिमित्त उमरखेड तालुका कार्यकारणीच्या वतीने 14 एप्रिल 2023 रोजी उमरखेड शहरात सार्वजनिक जयंती उत्सवाला थंड पेय एनर्जी ड्रिंक वाटप करण्यात आले होते.

तालुका कार्यकारणीने ठरवल्याप्रमाणे उमरखेड शहरात भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा करण्यासाठी दिनांक 29- 4 -2023 रोजी गीतगायन, प्रबोधन, आणि संमोहन हिप्नॉटिझम चा भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यात आला तर दुपारी 3-5 पर्यंत
तालुक्यातील गायक व संगीतकार यांचा भीम गीतांचा दणदणीत कार्यक्रम पार पडला.

सायं 5-ते 7 पर्यंत व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला
व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते सर्वजित बनसोडे प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
गोविंद दळवी प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
माधव दादा जमदाडे
नेते वंचित बहुजन आघाडी
रात्री 7-10 वाजेपर्यंत संमोहन तथा मनोविकार तज्ञ डॉ.नवनाथ गायकवाड यांचा डोळ्यावर विश्वास न बसणारा,संमोहनाचा जबरदस्त कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले, धनंजय गायकवाड , जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, मोहन राठोड जिल्हा प्रभारी यवतमाळ, जॉन्टिभाऊ भाऊ विनकरे जिल्हा सचिव सतीश खाडे जिल्हा कोषाध्यक्ष, विजयराव लहाने, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, भारत कांबळे जिल्हा सदस्य, सय्यद हुसेन मौलाना जिल्हा संघटक, सुभाष सावते जिल्हा उपाध्यक्ष,
कार्यक्रमाला खेड्यापाड्यातून व शहरातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली, व यशस्वीरित्या अतिशय शांततेत भीम जयंती महोत्सव पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वात तालुका पदाधिकारी, संबोधी गायकवाड सभापती न. प. ढाणकि देवानंद पाईकराव तालुका महासचिव, मार्शल विनोद बरडे पंकज गायकवाड तालुका महासचिव, प्रतीक धोंगडे बबलु भालेराव, यांनी तन मन धनाने प्रयत्न केले.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “वंचित बहुजन आघाडी उमरखेड तर्फे भीम जयंती महोत्सव 2023 उमरखेड मध्ये थाटामाटात साजरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!