ब्रेकिंग न्यूज तीव्र भिषण-पाणी-टंचाई धडक निषेधार्त मोर्चा १० में सकाळी 9 वाजता – कृषी उत्पन बाजार समिती -येथून निघनार.

youtube

ब्रेकिंग न्यूज तीव्र पाणीटंचाई धडक मोर्चा 10 मे रोजी ढाणकी येथे

ढाणकी

ढाणकी येथील तिव्र पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करणे, व घरकुल योजना तात्काळ राबविणे यासह अन्य मागण्यासाठी दिनांक १० मे २०२२ गुरुवार रोजी भव्य आक्रोश मोर्चा व एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या अनुपस्थितीत लिपिक राजू दवणे यांना देण्यात आले .

दोन वर्षा पासून वरून राजा मनसोक्त पणे बरसत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ढाणकी पासून काही अंतरावर असलेली पैनगंगा नदी पात्रातून पाणी वाहते लाखो रुपये खर्चून पाईप लाईन टाकण्यात आली तरी पण योग्य नियोजना अभावी नागरिकाला महिन्यातून दोन वेळ नळाला पाणी येत आहे

ढाणकी येथे तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. नगरपंचायत कडून या तिव्र पाणीटंचाईविषयी तोडगा काढण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना होतांना दिसत नाही. यामुळे नागरिकांत तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासह नगरपंचायत स्थापन झाल्या पासून शहरात एकही घरकुल शासना कडून आले नाही शकडो नागरिक घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत रमाई आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना या दोन्ही घरकुल योजना राबविणे गरजेचे असतांना याविषयी सुध्दा नगरपंचायतकडून कुठलीही हालचाल होतांना दिसत नाही. यामुळे येथील प्रशासनाच्या निषेधार्थ  आक्रोश नागरिकांच्या लोकहिताच्या मागण्यांसाठी नगरपंचायत मोर्चा काढून एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार होते मात्र दिनांक ५ मे रोजी होणारे आंदोलन आणि मोर्चा दिनांक १० मे रोजी होणार असल्याचे आंदोलन कर्त्यांनी लेखी निवेदनातून दिले. मागण्या मान्य कराव्या अशी आग्रही मागणी केली आहे यावेळी निवेदन देतांना बाळासाहेब चंद्रे सभापती कृषी उत्त्पन्न बाजार समिती संजय कुम्बरवार माजी सभापती पंचायत समिती उमरखेड, शेख खाजा माजी सभापती पंचायत समिती  ,न.प.उ. शेख जहीर जमीनदार  ता.यु.से.अध्यक्ष संभाजी गोरठकर ,काँ. श. अध्यक्ष अमोल तुपेकर ,बंटी जाधव शिवसेना शहर प्रमुख ,दीपक पाटील चंद्रे ,वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव ज्योन्टी विनकरे स्वप्नील पराते नगरसेवक ,संबोधी गायकवाड, बाळा करकले ,शेख बशीर यांनी सकाळी ९ वाजता आठवडी बाजारातून भव्य मोर्च्या मध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन ढाणकी शहरातील नागरिकांना केले आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!