ही संधी पुन्हा येणार नाही,ही आपली पहिली आणि शेवटची संधी : मनोज जरांगे पाटील

youtube

ही संधी पुन्हा येणार नाही,ही आपली पहिली आणि शेवटची संधी : मनोज जरांगे पाटील

उमरखेड :
मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी मागील अनेक दिवसांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठमोठे आंदोलन उपोषण केलेत आज दिनांक सात डिसेंबर रोजी येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाच्या प्रांगणात विराट सभेतून जरांगे पाटील यांनी बोलताना ही आपली पहिली आणि शेवटची संधी अशी संधी पुन्हा येणार नाही या संधीचं सोनं करा महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या ही आपली मागणी आहे व तो आमचा हक्क आहे .

महाराष्ट्रभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून महाराष्ट्र सरकारला दिनांक चोवीस डिसेंबर पर्यंत अवधी देण्यात आल्याचे सांगितले जर आरक्षण मिळालं नाही तर पूर्ण सकल मराठा समाजाला सोबत घेऊन पुन्हा एकदा आंदोलन उभं करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले
आरक्षण मिळेपर्यंत एक इंच ही मागे हटणार नाही असा शब्द जरांगे पाटील यांनी आपल्या सभांमधून दिला आहे यामुळे मराठा समाजाचा आंदोलन येत्या काळात अधिक आक्रमक होण्याचे चिन्ह आहेत
. आत्तापर्यंत 35 लाख मराठा समाजांना कुणी प्रमाणपत्र देण्यात वाटप करण्याचे येत असल्याचे सांगितले .
दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास म्हणजे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला असल्याचे बोलून कडाडून हल्लाबोल केला
पुढे बोलताना छगन भुजबळ ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या मागण्यांच्या विरोधात उभे टाकले आहेत .
सरकारला उद्देशून बोलताना मंत्री छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मराठा आरक्षण विषयी जर विरोध करत असेल तर त्याला मराठा समाज माफ करणार नाही यावरून दोन जातीमध्ये राजकारण करणे करू नये असाही भुजबळांना खोचक सल्ला दिला

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला यानंतर आता मराठा समाज हा मुळातच कुणबी आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन दिनांक 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा हा इशाराही दिला .

हा प्रश्न दोन समाजाच्या आरक्षणाबाबतीतला सामाजिक विषय असला तरी यावरून राजकारण होताना दिसत आहेत त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत तर लोकसभा आणि विधानसभा च्या निवडणुकीत तोंडावर आले आहेत त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी या वादाचा राजकीय फायदा कोणाला होऊ शकतो हे आपणास माहित आहे अशी बोलले .

24 डिसेंबर पर्यंत आम्ही शांत राहणार आहो जर आरक्षण मिळाला नाही तर त्यांच्या परिणाम सरकारला भोगावे लागणार छगन भुजबळ यांनी एकूण मराठा समाजावर अन्याय केला तर याद राखा भुजबळ जातिवाद करत आहे सत्तेत असलेल्या मंत्र्यांनी कोणत्याही जातीची मागणी करता येत नाही तसेच आरक्षण असणाऱ्या मराठ्यांनी आरक्षण नसणाऱ्या मराठ्यांच्या पाठीमागे उभे राहावा एकजूट राहा हीच योग्य वेळ आहे पुन्हा येणार नाही आरक्षणासाठी एकजूट राहा भविष्यासाठी लेकरांच्या भविष्यासाठी एकजूट राहा

तसेच भुजबळ यांनी 35 ते 40 वर्ष सत्ता भोगली उच्च दर्जाचे मंत्री असलेले गोरगरिबांच्या लेकरांच्या आरक्षणाच्या आड येत आहे .
शिंदे समितीने मराठ्यांचे पुरावे शोधणे सुरू केलेले आहेत 35 लाख नोंदी सापडले असून प्रमाणपत्र ही वाटप करण्यात येत आहे परंतु आम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे सरकारला एक महिन्याची कालावधी मागितली दोन वेळा कालावधी दिली परंतु सरकारने आरक्षण दिले नाही येत्या 24 डिसेंबर रोजी सरकारने आरक्षण दिले नाही तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार असेही सांगितले तसेच सकल मराठा समाज बांधवांना व्यसनापासून दूर राहण्यासाठी विनंती केली .मराठ्यांना यापूर्वी आरक्षण समजलं नाही तर आत्ता आरक्षण समजलं आहे यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहून एकजूट राहून ही आलेली संधी गमू नये असे सांगितले .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!