महागाव येथील चिमुकली उन्नतीला हवी आहे शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात.
*वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून केली उन्नतीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत*.
महागाव येथील चिमुकली उन्नतीला हवी आहे. शस्त्रक्रियेसाठी मदतीचा हात.
ढाणकी …
सामाजिक सेवेचा एकदा वसा घेतला कि तो आयष्यभर चालु राहतो. समाजात वावरताना आपणही समाजाचे देण लागतो ही भावना मनात असली कि आपोआपाच आपल्या हातून समाजसेवा घडते आणि त्या आपल्या सेवेमुळे कोणाच्या तरी दुःखावर थोडी का होईना फुंकर घातली जाते. असेच एक उदाहरणं द्यावंच झाल्यास ढाणकी येथील लोकमत चे पत्रकार तथा रुग्णकल्याण समिती चे सदस्य उदय पुंडे यांचे द्यावे लागेल. वाढदिवस म्हटले कि हजारो रुपये खर्च आलाच मात्र तो अनावश्यक खर्च न करता त्यांनी एका मुलीच्या ऑपरेशन साठी आर्थिक मदत केली. महागाव येथील उन्नती प्रभाकर गावंडे या सहा वर्षाच्या चिमुकली ला विल्सन नावाचा आजार झाला असून तिचे यकृत प्रत्यारोपण करण्याचे डॉक्टर नी सांगितले. उन्नती ते पालक ड्रायव्हर असून या शास्त्रक्रिये साठी 16 लाख रुपये खर्च येणार आहे. आतापर्यंत 10 लक्ष रुपये जमा झाले आहेत. ही माहिती उदय पुंडे यांच्या पर्यंत आली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता यथाशक्ती मदत ऑनलाईन पाठवली. कृती ही लहान असते मात्र त्यांच्या मुळे कोणाच्या तरी जिवनात थोडा का होईना आनंद येऊ शकतो. आज उन्नती चे पालक सामान्य कुटुंबातील आहे त्या मुळे आपल्या मुली साठी ते धडपड करत आहेत. 16 लाख जमवणे हे त्यांच्या साठी अशक्य गोष्ट असूनही समाजातील दात्यांनी मदत केल्याने 10 लाख जमा झाले आहे. समाजातून अजूनही मदतीचा ओघ सुरु असून उदय पुंडे सारखे आपणही उन्नती साठी आपला मदतीचा हात पुढे करू शकता. आपल्या एका छोट्या मदती मुळे कोणाचे तरी प्राण वाचेल.
उदय पुंडे यांच्या या कृतीचे गावात कौतुक होत आहे.
चौकट
उन्नती साठी आर्थिक मदत गोळा करण्या मध्ये शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे चा सुद्धा मोठा हात असून या मध्ये 200 लोकांची टीम असे सामाजिक कार्य नेहमीच करत असतात. जेव्हा ट्रस्ट ला उन्नती गावंडे बद्दल कळाले तेव्हा तिचा शस्त्रक्रिये साठी समाजातून मदत गोळा करण्यासाठी ट्रस्ट पुढे आले आणि ट्रस्ट ने सुद्धा मदत केली.
उन्नती साठी सर्वांनीच मदत करावी व मदती साठी माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन शिक्षक नागेश मिराशे (मो. 9970642484) यांनी केले आहे.
Very interesting subject, appreciate it for posting.Expand blog