चल पुढे मी येतो तुझ्या मागे पाच तासाच्या अंतराने पती पत्नी चे निधन.

youtube


हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथील घटना
बरडशेवाळा ता.६ ( बातमीदार) बरडशेवाळा ता. हदगाव येथील अल्पभुधारक शेतकरी साथ जियेंगे साथ मंरेगे या म्हणीप्रमाणे राऊत कुटुंबातील सहा रोजी सकाळी सात वाजता पत्नीच्या निधनानंतर अवघ्या चार तासात पतीचे निधन झाले असल्याची घटना घडली.
बरडशेवाळा येथील अल्पभुधारक शेतकरी सदाशिव रेशमाजी राऊत वय ७० कुटुंब आपला मुख्य व्यवसाय शेती करत असतात. अनुसयाबाई राऊत वय ६५ याचें वृद्धापकाळाने शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले.कोरोना आजारामुळे खबरदारी घेत रक्तातील नातेवाईकांच्या मदतीने अंतसस्काराची तयारी करत असतानाच सदाशिव राऊत यांना पत्नीच्या निधनाचे दुःखातच अकरा वाजता अचानकपणे सदाशिव राऊत यांची प्राणज्योत मावळली.बरडशेवाळा सह परीसरात घटनेची माहिती मिळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. ६ रोजी दुपारी दोन वाजता दोघांवर एका लगत एक अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!