अतिवृष्टी व गुलाब चक्रवादळामुळे ओला दुष्काळ व नुकसान याचे पिक पेरा सरसकट नुकसान भरपाई मदत द्यावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडे काँग्रेस नेत्यांची धडक.
उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी व गुलाब चक्रीवादळामुळे ओला दुष्काळ व झालेल्या नुकसानीचे पिकपेरा निहाय सरसकट नुकसान भरपाई व तात्काळ भरीव मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे उमरखेड काँग्रेस नेत्यांची धडक
उमरखेड ..
मुबई उमरखेड -महागाव तालुक्यावर आलेल्या अस्मानी संकटाने संपूर्ण उमरखेड तालुका उध्वस्त झाला असल्याने उमरखेड- महागाव तालुक्यातील व पैनगंगा नदीपात्राच्या आजू-बाजू च्या गावातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने यावर महाराष्ट्र शासनाकडून तात्काळ सरसगट मदत द्यावी ही मागणी करतांना ताबडतोब मुबई गाठून उमरखेड-महागाव विधानसभेचे माजी आमदार विजयरावजी खडसे साहेब व काँग्रेसचे युवा नेते श्री गोपालभाऊ अग्रवाल यांनी तात्काळ सर्व परिस्थितीचा लेखाजोखा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.श्री विजयरावजी वडेट्टीवार साहेब यांची भेट घेऊन तात्काळ सरसकट,भरीव मदत करण्याची मागणी केली,मा ना वडेट्टीवार साहेबांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करून तात्काळ अहवाल मागितला व या अस्मानी संकटामध्ये तात्काळ भरीव मदत देण्याची ग्वाही दिली.
उमरखेड तालुक्यात होत असलेला सततचा पाऊस व गुलाब चक्रीवादळामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होऊन होत्याचं नव्हतं झालेले दिसत आहे, अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याला धीर देण्यासाठी शासनाने माय बापाची भूमिका घेणे गरजेचे आहे त्या उद्देशाने शेतकऱ्यांना कोणतेही पंचनामे न करता तत्काळ सरसगट पेरानिहाय भरीव मदत देण्याची मागणी केली.त्याच प्रमाणे शेतकरीराजाचे गुरे-ढोरे सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठं आर्थिक नुकसान झाले आहे तसेच सततच्या पावसाने व पुरच्या पाण्याने भरपूर घरांची पडझड झालेली आहे त्यामुळे याबाबतही तात्काळ भरीव मदत देण्याची मागणी करण्यात आली तसेच काल उमरखेड-पुसद रस्त्यावरच्या दहागाव नाल्यामध्ये एस टी बस पुरात वाहून गेल्याने या दुर्घटनेमधील मृत्यू पावलेल्यांना तात्काळ भरीव मदत देण्याची मागणी करण्यात आली तसेच उपस्थित गोपालभाऊ अग्रवाल काँग्रेस चे नेते मा.जी आमदार खडसे .