गडचिरोलीत लक्षणीय कामगिरी बजावणारे ‘डँशिग कमांडो’ सुनील गिरी पनवेल पोलीस स्टेनला रूजू.

youtube

गडचिरोलीत लक्षणिय कामगीरी बजावणारे ‘डॅशिंग’ कमांडो “सुनील गिरी” पनवेल पोलीस स्टेशनला रुजू.

प्रतिनिधी – चिफ ब्युरो
पोलिस सेवेत अनेक वेळा चर्चेत असणारा नक्षलवादी भाग हा गडचिरोली म्हणून ओळखला जातो बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा एकदा तरी एक १वीर्य भागात काम करण्याकरिता लागली जाते .तेथील नक्षली भाग, घनदाट जंगल, परिसरात कधी काय होईल याची शाश्वती नसणारा अचानक मृत्यू समोर कधी न कळेल हे कुणालाही सांगू शकणार नाही आणि अशा परिस्थितीवर मात करून अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कोसो दूर राहून कर्तव्यदक्ष पणे डोळ्यात तेल घालून आपली सेवा पोलिस आजही बजावीत आहेत.
नुकतेच एक ‘डॅशिंग’पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी (पनवेल शहर पोलीस स्टेशन) येथे नियुक्ती झाली. त्यांना पाहिले की अनेक जणांना नकळत हेवाच वाटतो. नकळतच तरूणाईच्या तोंडून सिंघम असा सूर येतो. या व्यक्तिमत्त्वाचे गडचिरोली चे काही किस्से कथन केले आहे. सुनील गिरी हे मूळ मालेगाव. तालुका .अर्धापूर जिल्‍हा नांदेड, जिल्ह्यातील आहे आतापर्यंत ते नांदेड व गडचिरोली येथे सेवेत होते 2018 ते 2019 पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी काम केले. गडचिरोली जिल्ह्याची सी ६० मध्ये ‘कमांडो’ म्हणून रुजू होते. अनेक वेळा नक्षली सोबत चकमक झाली होती. असे सुनील गिरी यांनी अनुभवातून सांगितले. नक्षल परिसरात अनेक संधी आहे काम करण्यासाठी तेथील गरीब जनतेसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला तेथील आदिवासी नागरिक खूप प्रेमळ कष्टाळू आहे असे गिरी म्हटले. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या चांगल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचणे व प्रबोधन करून खूप काम केले. होमटाऊन नांदेड ठिकाणी गिरी सेवेत असताना तेथील पोलिस अधीक्षक शैलेश बळकवडे तसेच अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या शिस्तप्रिय कामाची झुळक दाखवायला सुरुवात केली ३० जवानांची एक तुकडी असते असे गिरी यांनी सांगितले. संशयास्पद चाहूल लागताच कामगिरी व निघतांना नक्षलवादी यांनी येण्या जाण्याच्या रस्त्यावर काही घातक भूसुरुंग तर पेरली नाहीत नाही शहानिशा करण्याकरिता आमची टीम सदैव सतर्क असते. व त्याकरिता सूक्ष्म चेकिग कटाक्षाने करून पुढचे पाऊल आम्ही टाकत असतो कधी काय होईल याची कल्पनाही कोणालाही नसते म्हणून सर्व टीम ऍक्शन मोडवर असते असे सुनील गिरी अनुभवातून सांगतात.
सुनील गिरी यांचे चुलते प्रभाकर गिरी हे पोलीस निरीक्षक परभणी जिल्ह्यात कार्यरत होते. जनतेच्या अनेक अडचणी सोडून भयमुक्त प्रशासन देण्याचे आमचे चुलते यांनी काम केले आहे. पोलिस सेवेत उत्कृष्ट काम केले होते आता सेवानिवृत्त झाले आहेत खरे तर मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली पोलीस सेवेत येण्यासाठी माझे शिक्षण बी.एस.सी एग्रीकल्चर वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ (परभणी) या ठिकाणी झाले आहे आज मला पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने एक अनुभवी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे.तसेच मला , गडचिरोली येथे जी 45 दिवसांची commondo training दिली गेली त्या मध्ये सुनील गिरी यांनी प्रथम पारितोषिक मिळवले होते , तसेच ( best commondo) चा अवॉर्ड त्यांनी मिळवला होता , त्यामुळे त्यांना dr हरी बालाजी ips यांनी c60 मध्ये दाखल करून घेतले होते.
“जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” हे ब्रीद वाक्य मी उराशी बाळगून आज काम करीत आहे. असे पोलिस उपनिरीक्षक सुनील गिरी यांनी आपल्या अनुभवातून सांगितले आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!