ढाणकी कोविड सेंटर चा लोकार्पण सोहळा संपन्न.

youtube

 

ढाणकी कोविड सेंटर चा लोकार्पण सोहळा संपन्न.

जिल्हातील पहिले लोकसहभागातून उभे राहिले कोविड सेंटर.

ढाणकी प्रतिनिधी -सविता चंद्रे

ढाणकी येथे यवतमाळ जिल्हातील पहिले लोकसहभागातून उभे राहिलेले कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा आज दिनांक 14 मे रोजी थाटात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात पार पडला.
ढाणकी शहरात कोरोनाने थैमान घातले असताना नागरिक भयभीत झाले होते. दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत असताना शहरात कोविड सेंटर असावे अशी कल्पना सामाजिक माध्यमातून पत्रकारांनी मांडली आणि पाहता पाहता नागरिकांनी त्यात सहभाग घेत ही संकल्पना प्रत्यक्ष रूपात साकारल्या गेली.
कोविड सेंटर उभे राहावे म्हणून शहरातील तसेच परिसरातील नागरिकांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या परीने मदत केली. विशेष म्हणजे या लोहसहभागातील कार्यासाठी शहरातील रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या गरीब व्यक्तीने सुद्धा आपल्या एका दिवसाची मजुरी देत आपला खारीचा वाटा उचलला.
लोकार्पण
सोहळ्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील व राजकीय पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. 30 बेडचे सुसज्य असे ऑक्सिजन सुविधा युक्त कोविड सेंटर आज नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले असून आता बंदी भागातील आणि ढाणकी तील नागरिकांना कोविड लढ्यात मोलाची मदत होणार आहे.
ढाणकी हे शहर दानदात्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. कोणत्याही कार्यासाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर शहरातील नागरिक मोकळ्या मनाने मदत करत असतात. आजच्या महामारी च्या काळात शहरात कोविड सेंटर असणे हे खूप महत्वाचे होते.
लोकापर्ण सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार विजयराव खडसे तर उत्तघाटन आमदार नामदेवराव ससाणे यांच्या हस्ते पार पडले . या वेळी बोलताना आमदार ससाणे यांनी ही चळवळ उभी करणारे पत्रकार आणि या कार्यासाठी मदत करणारे दान दाते यांचे कौतुक करत अतिशय मोलाचे कार्य केले असल्याचे सांगितले आणि भविष्यात कोणतीही मदत लागल्यास तात्काळ करण्याचे आश्वासन दिले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
सामाजिक माध्यमातून उभी राहणारी ही बहुतेक पहिलीच चळवळ असून लोकांचा सहभाग या मध्ये मोठ्या प्रमाणात होता हे विशेष. शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मागील बाजूस हे कोविड सेंटर उभे राहिले असून परिसरातील नागरिक या मुळे आनंदित आहे. हा लोकार्पण सोहळा कोविड संदर्भातले सर्व नियम पाळून पार पडला असून मंचावर नगराध्यक्ष सुरेशलाल जयस्वाल, उपाध्यक्ष जहीर भाई, वसंतराव उर्फ बाळू पाटील चंद्रे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, पं स सभापती प्रज्ञानंद खडसे, चित्तांगराव कदम जी प सदस्य, तहसीलदार आनंद देऊळगावकर, आकाश सुरडकर मुख्याधिकारी न प ढाणकी, ठाणेदार विजय चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी किशोरb कपाळे, डॉ लक्ष्मीकांत रावते,डॉ. गोविंद जाधव प संदीप ठाकरे शहरातील नगरसेवक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, समाजसेवक, प्रतीष्टीत नागरिक इद्यादी मान्यवर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ढाणकी शहर पत्रकार संघाने विशेष परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!