उपविभागातील सर्वच पुलावर कठडे बांधावे भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानाची मागणी.
उपविभागातील सर्वच पुलांवर कठडे बांधावे
भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठाण ची मागणी
उमरखेड : –
उमरखेड ते पुसद रस्त्यावरील दहागाव पुलावरुन महापुराचे पाणी वाहत असतांना बस चालकास पुलाची दर्शनीय दिशा समजली नसल्यामुळे बस पलटी होऊन चार जनांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली त्यामुळे अशा दुर्देवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये व प्रवाशी वाहनांना सुरक्षीत प्रवास करता यावा यासाठी उपविभागातील सर्वच धोकादायक पुलांवर सिमेंट किंवा लोखंडी खांब उभे करावे अशी मागणी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ . विजयराव माने यांच्या नेतृत्वात उपविभागिय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे . याची त्वरीत दखल घेऊन उपविभागिय अधिकाऱ्यांनी उपविभागिय अभियंत्याना योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत .
भविष्यात अपघात होऊन जिवीत हानी होऊ नये यासाठी प्रशासनाने धोकादायक पुलांवर सिमेंट किंवा लोखंडी कठडे बसवून त्यावर रंगीबेरंगी पटटे मारल्यास वाहन चालकांना पुलाची दिशा समजेल व पाण्याची सुरक्षित पातळी समजेल या करीता भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. विजयराव माने यांच्या नेतृत्वात प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी निवेदन दिले होते . त्या अनुषंगाने उपविभागिय अभियंत्यांना नियमानुसार योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत .