जागतिक चिमणी दिना निमित्त जलपात्र व पक्षासाठी पाणपोई

youtube

जागतिक चिमणी दिना निमित्त जलपात्र वितरण तसेच पक्ष्यांसाठी पाणपोई
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था उमरखेडचा उपक्रम
उमरखेड :

काळाच्या ओघात चिमणी दिसेनाशी झाली. आत्ताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. कविता, बडबड गीते याचपुरती चिमणी शिल्लक राहते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. शहरीकरणामुळे आता सिमेंट काँक्रीटची घरी उभी राहिली आणि चिमण्यांचे कौलारू घरांचे छञ हरवले. मोबाईल टॉवरमधून उत्सर्जित होणारी किरणे, कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, बेसुमार वृक्षतोड, जागतिक तापमान वाढ यामुळे असंतुलित पर्यावरणाचा फटका चिमण्यांना बसला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे अन्न आणि पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे चिमण्यांच्या संख्येत विलक्षण घट झाल्याने चिमण्यांना संकटग्रस्त प्रजातीच्या सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे.पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या चिमणीला विद्युत चुंबकीय उत्सर्जना बरोबरच हवामान बदल आणि प्रदूषणाचा धोकाही वाढला आहे .या पार्श्‍वभूमीवर चिमण्यांचे संरक्षण आणि त्याविषयी जागृती साठी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. कुठे तरी प्रत्येकाचे बालपण चिऊताईच्या आठवणींशी जोडले गेले आहे. अनेकांचे बालपणीचे जेवण चिऊताईच्या घासाने सुरू झाले आहे. दोन पायांनी टुणटुण उड्या मारणारी चिमणी, तिचा चिवचिवाट, एवढ्याशा पाण्याने स्नान करण्याचा तिचा उत्साह आता दुर्मिळ होत चालला आहे.
चिमणी वाचवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था उमरखेड च्या वतीने जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून चिमण्यांना पाणी ठेवण्यासाठी मातीच्या जल पात्रांचे वितरण करण्यात आले तसेच त्यांना पाणी पिण्यासाठी शेत शिवारात विविध ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर ,आजूबाजूंच्या झाडावर पाणी व अन्न ठेवावे. घरटी तयार करून ठेवावी, अडगळीची जागा निर्माण करून ठेवावी. जेणेकरून चिमण्यांची संख्या वाढून पुन्हा त्यांचा चिवचिवाट वाढेल.असा संदेश यावेळी देण्यात आला.
जागतिक चिमणी दिवसा निमित्त आयोजित या कार्यक्रमाला भारत खेलबडे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रभारी) वनविभाग उमरखेड, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे पुर्व महाराष्ट्र अध्यक्ष दिपक ठाकरे ,अमरावती विभागीय अध्यक्ष प्रभाकर दिघेवार ,उमरखेड तालुका अध्यक्ष गजानन रासकर, राम किसन शिंदे, मनोज कदम, राजेश माने, देविदास कानडे, विजय नगरकर, जयंत दुधेवार, शंकर बिचेवार,शुभम बिचेवार,प्रशांत बिचेवार,शिवा हिंगमीरे,जान्हवी कदम तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!