उमरखेडच्या जिनिंग प्रेसिंगमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग आणणार – डॉ . विजय माने

youtube

उमरखेडच्या जिनिंग प्रेसिंगमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग आणणार – डॉ . विजय माने

प्रतिनिधी

उमरखेड :
शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असलेल्या आपला जिन प्रेस जिनिंग प्रेसींग संस्थेला सत्ताधार्‍यांनी डबघाईच्या उंबरठ्यावर नेवून ठेवले आहे . एकेकाळी पश्चिम महाराष्ट्राच्या समोर असलेल्या या जिन प्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे त्यामुळे अगोदर मागील ३ वर्षापूर्वीपासून बंद पडलेली प्रेसिंग प्रक्रिया सुरु करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच शेतकऱ्यांसाठी प्रक्रिया उद्योग सुरु करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ . विजय माने यांनी केले .
सत्यशोधक शेतकरी संघ पॅनलच्या हरदडा अमृतेश्वर देवस्थान येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिनिंग प्रेसिंगचे जेष्ठ सभासद श्रीराम पाटील नलावडे हे होते तर विचार पिठावर यावेळी आमदार नामदेव ससाने , भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर , विजय खडसे , कृउबास माजी सभापती क्रिष्णा पाटील देवसरकर, पं .स . माजी सभापती प्रज्ञा खडसे, नितिन माहेश्वरी , रमेश चव्हाण, डॉ .आरती फुफाटे, चितांगराव कदम, नगरअध्यक्ष ढाणकी सुरेश जयस्वाल,रोहित वर्मा , सुदर्शन रावते , प्रविण पाटील मिराशे, आदित्य माने , अजय बेदरकर, संदीप ठाकरे , महेश काळेश्वरकर बाबुराव पाटील कदम , मोहन नाईक आदि उपस्थित होते .
या जिन प्रेसने आतापर्यंत शेतकर्‍यांना काय दिले . आपला ( शेतकऱ्यांचा )जिन प्रेस आपला राहिला नाही त्याला परत आपला जिन प्रेस करायचा असून जीनचा चेहरा मोहरा केवळ शेतकरीच बदलू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी यापुढे रेशिम उद्योग यासारखे प्रकल्प उभारणार व लाभांशावर शेतकऱ्यांना पैसा देवून शेतकऱ्यांचे हित साधणार असल्याने एका विचाराच्या सत्यशोधक पॅनल ला निवडून देण्याचे आवाहन यावेळी डॉ विजय माने यांनी केले .
यावेळी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर म्हणाले की , माजी जी . प . बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी पैशाच्या भरवशावर स्वतः पॅनल टाकली . तिला महाविकास आघाडीचे नाव दिले परंतू मीच सर्व काही काँग्रेस पक्षाचा म्हणत माजी आमदार विजय खडसे व मला विश्वासात न घेता पॅनल तयार केली . पैशामुळे पक्षातर्गत अहंकार करून दोन माजी आमदारांना दुर केल्याने सर्वपक्षीय सत्यशोधक पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केले असून आम्ही काँग्रेसचेच आहोत आणि राहणार मात्र संस्था वाचविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय सत्यशोधक पॅनलमध्ये सामील झालो असून आमची लढाई राम देवसरकर यांच्या हिटलरशाही विरोधात असल्याचे सांगीतले .
दोन माजी आमदारांना ते माझ्या पॅनलमध्ये सतरंजीवर देखील बसलेले चालत नसल्याचे सांगून राम देवसरकर यांनी अपमानीत केले . त्यांना काँग्रेस पक्ष सांभाळत नाही ते आज महाविकास आघाडी वज्रमुठची भाषा वापरतात . आमची लढाई हेकेखोरपणा करणाऱ्या त्या लहानशा नेत्यासोबत होत असून जिनिंग ची लढाई ही उमरखेड तालुक्याला कलाटणी देणारी ठरणार असल्याचे यावेळी माजी आमदार विजय खडसे यांनी सांगीतले .
आमदार ससाने यांनी जिनींग प्रेसिंगला उभारणी देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हित साधण्याचे काम करण्यात येईल असे आश्वासन देवून मागील ५ वर्षात सत्ताधाऱ्यांना शेतकर्‍याचे हित साधण्यासाठी लकवा मारला होता काय ? असा प्रश्न उपस्थित केला .
यावेळी नितिन भुतडा, संदीप हिंगमीरे , खाजा कुरेशी , नितिन माहेश्वरी , देवानंद मोरे, चितांगराव कदम, रमेश चव्हाण, बापुराव पाटील कोहळीकर , चक्रधर देवसरकर यांनी मनोगत व्यक्त केले . संचलन श्रीधर देवसरकर यांनी तर आभार किशोर वानखेडे यांनी मानले .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!