प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

youtube

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

पुणे, पिंपरी चिंचवड :

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाझाली पिंपरी चिंचवड संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीच्या अनुषंगाने पिंपरी येथील आंबेडकर चौकात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जगातले एकमेव व्यक्ती होते ज्यानी आपल्या लेखणीच्या बळावर शैक्षणिक, सामाजिक, राजनितिक, अशा अनेक प्रकारचे बदल घडवून आणले अशा महान युगप्रवर्तक, क्रांतिकारक, अर्थशास्त्रज्ञ जगात भारताची मान आदराने उंचावणारे प्रज्ञासूर्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले, माता रमाई, माता सावित्री यांच्या प्रेरणेने तळागाळातील लोकांपासून सर्वच नागरिकांची दखल घेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड सामाजिक बांधिलकी व पत्रकारितेतील चौथा स्तंभाची जबाबदारी सांभाळत अनेक उपक्रम राबवत असते असे संघटनेच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा मंदाताई बनसोडे यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राजेश शिंदे, महिला अध्यक्षा मंदा बनसोडे, उपाध्यक्षा उषा लोखंडे, सचिव निर्मला जोगदंड, अर्चना कांबळे आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!