दिवशी येथील प्रकरणावरून ढाणकी कडकडीत बंद.
दिवशी प्रकरणाहुन ढाणकी शहर कडकडीत बंद.
ढाणकी..
प्रतिनिधी मराठवाड्यातील भोकर तहसील अंतर्गत दिवशी या गावातील पाच वर्षीय चिमुकलीवर निर्दयपणे बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता ढाणकी शहरातील मुन्नर वार हलबा हलबी आदिवासी महादेव कोळी या सामाजिक संघटनेने बुधवार दिनांक 27 जानेवारी रोजी यांची बंदचे आयोजन केले होते या बंदला यांची शहरातील सर्व व्यापारी बांधवांना संमती दर्शवत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली सामाजिक संघटनेने ढाणकी शहराचे आराध्य दैवत हनुमान मंदिर परिसरातील हॉलमध्ये शहरातील व आजूबाजूच्या जळगाव ब्राह्मणगाव यासह इतरही खेड्यापाड्यातून मोर्चाला येण्याची हाक दिली होती गाव खेड्यातील मोठ्या प्रमाणात महिला सह लहान मुलं आवर्जून उपस्थित राहिले मोर्चाला मोर्चाला हनुमान मंदिर इथून सुरुवात करण्यात आली मोर्चामध्ये सहभागी असलेल्या महिला पुरुष लहान बालक या सर्वांनी हातामध्ये काळे झेंडे आणि दंडावर काळी फीत लावून जाहीर निषेध नोंदवत त्यांची शहरातील प्रमुख रस्त्यांनी जुन्या बस स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रति मे जवळ निषेध मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या महिला मधून अनेक महिलांनी दिवशी येथील घटनेवर आपल्या प्रखर वाणीतून जाहीर निषेध नोंदविला व्यापारी बांधवांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवत या मोर्चामध्ये सहभाग नोंदविला शहराच्या इतिहासामध्ये आज पर्यंतच्या हा सर्वात मोठा निषेध मोर्चा निघाल्याची चर्चा उपस्थितांनी मधून निघत होती आयोजकांनी आपली मागणी ठाणेदार विजय चव्हाण यांच्यामार्फत शासनाला कळविली बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याकरिता पोलीस बंदोबस्त लावला होता संजय कुंबरवार यांनी मोर्चामध्ये समावेश झालेल्या सर्व बांधवांचे तसेच ढाणकी नगरीतील व्यापाऱ्यांचे आभार मानले.पोलिसाचा चोख बंदोबस्त होता.