धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड – सौ उज्वला बुरंगवाले

youtube

धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी –सौ.उज्ज्वला बुरंगवाले.
सांगोला – तालुक्यातील सर्व सामान्य गोरगरीब महिलांच्या मदतीला धावून जाणार्‍या तसेच समाजातील विविध कार्यक्रम घेऊन समाजाला व महिलांना परिवर्तनाची दिशा देणार्‍या स्वत :वर विश्वास ठेवून वृत्त पत्रामध्ये लिखान करणार्‍या सौ. उज्ज्वला बुरुंगले यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती. सांगोला तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या उज्वला बुरूंगले यांची काल दि. १३.७.२०२१रोजी राज्य स्तरीय बैठकीत महत्त्व पूर्ण निर्णय घेऊन नियुक्ती करण्यात आली. आहे. महिलांवरती होणार्‍या अत्याचाराविरोधात लढणाऱ्या व महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे उज्वला बुरुंगले महिलांना आपुलकीची व जिव्हाळ्याची वागणूक देतात. महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवा मल्हार सेना संस्थापक अध्यक्ष मनोज सिराम,सरसेनापती सोनसळे,प्रदेश अध्यक्ष खेमनर , तसेच सविता चंद्रे पत्रकार प्रदेश अध्यक्ष यांनी माझी दखल घेतली व राज्य स्तरीय बैठकीत धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या जबाबदारीच्या पदावर नियुक्ती केले. पत्र उज्वला बुरुंगले यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. समाजाची बांधिलकी जोपासत प्रामाणिकपणे समाज हिताचे कार्य करीत संघटनेची प्रतिमा उंचावण्यासाठी व महाराष्ट्रात समाज संघटन वाढविण्यासाठी आपण अखंड पणे कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया उज्वला बुरुंगले यांनी व्यक्त केली.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!