रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी बापलेक गंभीर जखमी

youtube

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी बापलेक गंभीर जखमी

  • उमरखेड

शेतात काम करत असणाऱ्या शेतकऱ्यासह त्याच्या मुलावर रानडुक्कराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि,१५) तालुक्यातील जेवली गावाजवळील पेंदा शेत शिवारात घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्यात भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. सिन्हा मारुती धोत्रे (वय, ६५) व संतोष सिंह धोत्रे वय (वय, ४०) रा, जेवली असे  हल्ल्यात जखमी झालेल्या बापलेकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धोत्रे बापलेक शनिवारी सकाळी दोघेही पेंदा शिवारातील आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी अचानक रानडुक्कराने संतोषवर हल्ला केला. हे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडीलांवरही त्या डुक्कराने हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.
या हल्ल्यात संतोष यांच्या पोटाला, दोन्ही पायांच्या मांडीला तर वडिलांच्या डाव्या पायाला जखम झाली आहे. दोघांवर सोनदाभी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!