गाई ची सेवा हीच राष्ट्रीय सेवा, राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट साध्य -डॉ. विजय माने तीवडी-टाकळी येथे लंपी आजारावर मोफत लसीकरण कुपटी च्या कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.
गाई ची सेवा हीच राष्ट्रीय सेवा, राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट साध्य -डॉ. विजय माने
तीवडी-टाकळी येथे लंपी आजारावर मोफत लसीकरण
कुपटी च्या कृषी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
उमरखेड/प्रतिनिधी : उमरखेड तालुक्यातील टाकळी तीवडी येथे भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान आणि कृषी महाविद्यालय उमरखेड च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत जाणवरांच्या लंपी आजारावर विध्यार्थ्यांकडून मोफत लसीकरण करण्यात आले.
देशात लंपी रोगाचा वाढता आलेख उंचावत असताना कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शेतकऱ्याचे पशुधनाचे सौरक्षण करण्यासाठी टाकळी – तीवडी मध्ये मोफत लसीकरण करण्यात आले.
लम्मपी रोगाचा प्रादुर्भाव आणि लसीकरणासाठी लस आणि लसीकरण करण्यासाठी अपुरे मनुष्यबळ पाहता, कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थांना या अगोदरच पशुवैद्यीय तज्ञा मार्फत विद्यार्थांना प्रशिक्षित करून लसीकरण करण्यासाठी अपुरे असणाऱ्या मनुष्य बळावर मात करून कृषी महाविद्यालयाचे चैरमन डॉ. विजय माने यांनी गावोगावी शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन पशुधन सुरक्षेच्या दृष्टीने ठीक ठिकाणी लसीकरणाचे यशस्वी शिबिर घेण्यात आले आहेत.
आतापर्यंत १५०० जनावरांना पशुवैद्यक चिकित्सक यांच्या मार्गदर्शनात लसीकरण करण्यात आहे आहे.
तीवडी- टाकळी येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव माने तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ बी एन कुंभार
पशुधन विकास अधिकारी
तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय उमरखेड, डॉ एन आर कांबळे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी , कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के चिंतले, उपसरपंच विलासराव जाधव, शंकरराव हापसे (पोलीस पाटील), तंटा मुक्ती अध्यक्ष कैलास जाधव, डॉ वडतकर परिचर रशिद शेख (फिरता पशुवैद्यकीय दवाखाना ढाणकी), सेवादाता पशुधन पर्यवेक्षक मस्के, यासह लखन कायपलवाड, अजय गायकवाड, शिवम आडेकर, हरी वाघमारे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी केले तर प्रास्ताविक एस के चिंतले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीवडी – टाकळी च्या गावकऱ्यांनी सहकार्य केले. कृषी महाविद्यालयाच्या एन एस एस च्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.