उमरखेड शहरातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी

youtube

उमरखेड शहरातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी

उमरखेड
भारतीय स्टेट बँक शाखेला कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आपल्या स्टेट बँक शाखेत एटीएम नवीन कॅश डिपॉझिट मशीन बसवण्यात आलेली आहे. या मशीन द्वारा सर्व नागरिक आपल्या खात्यामध्ये पैसे कधी पण जमा करू शकतात व काढू पण शकतात. मशीन मध्ये पैसे जमा करण्यासाठी फक्त मोबाईल नंबर व खाते क्रमांक ची आवश्यकता असते व एकाच वेळी 49 हजार इतकी रक्कम मशीन मध्ये भरता येते. अशी किती पण रक्कम आपल्या चालू किंवा बचत खातात ग्राहकांना भरता येईल. तरी भारतीय स्टेट बँक शाखा उमरखेड द्वारा आपल्या दाराशी आणलेल्या या उच्चतंत्र ज्ञान मशीन चा सर्व ग्राहकांनी फायदा घ्यावे व त्यासाठी जर शाखेमध्ये खाते नसल्यास लवकरात लवकर खाता उघडण्यात सहकार्य करावे अशी माहिती शाखा प्रबंधक प्रदीप पाटील यांनी दिली आहे. मशीन मध्ये चालू खाता धारक ( करंट अकाउंट ) धारक व्यापारी पण रक्कम भरू शकतात. सदर मशीन एटीएम लावी मध्ये लावली असल्यामुळे, बँकेच्या व्यवहाराची वेळ संपल्यावर ही ग्राहक कधी पण पैसे भरू शकतात, हे विशेष मशीन मध्ये पैसे भरण्यासाठी ग्राहकांना मार्गदर्शन दिले जाईल व मदत पण करण्यात येईल अशी माहिती शाखा प्रबंधक यांनी दिली आहे.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “उमरखेड शहरातल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!