जिव्हाळा संस्था जिल्हा अधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते सन्मानित.
जिव्हाळा संस्था जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या हस्ते सन्मानित
कोरोना काळातील अविरत कार्याचा गौरव
पुरस्कार स्वीकारताना जीवाला संस्थेचे पदाधिकारी
यवतमाळ जि. प्र. :- इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड जि. यवतमाळ महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या या कमी कालावधी मध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या संस्थेला “द रियल सुपर हिरोज- 2020” कोरोना वॉरियर्स फॉरेवर स्टार इंडिया अवार्ड, दिल्ली यांच्या वतीने कुरियर च्या द्वारे अतिशय सुरेख मोमेंटो व कोरोना वॉरियर्स बुस्टर पाठून नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक व ग्रामीण क्षेत्रामध्ये मागील 9 वर्षापासून महाराष्ट्रातील यवतमाळ, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरण या कार्याच्या माध्यमातून संस्थेने मुहूर्त मेढ रोवली. जिव्हाळा संस्थेने लॉकडाऊन काळात केलेल्या कार्याची दखल “फॉरेवर स्टार इंडिया अवार्ड”, दिल्ली या नामांकित संस्थेने घेऊन “द रियल सुपर हिरोज- 2020” कोरोना वॉरियर्स या पुरस्काराने सन्मानित केले आहे. सदरील पुरस्कार यवतमाळ चे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला आहे सदरील पुरस्कार जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल मादावार व उपाध्यक्ष राजू हळदे यांनी स्वीकारला .
कोरोना ( कोविड 19 ) विषाणूच्या जीवघेण्या महामारीने मागील 8 महिन्यापासून संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहिर केला होता. लॉकडाऊन काळातील परिस्थितीने सर्वत्र वाताहत उद्भवली होती. आशा परिस्थित जीवन जगतांना समाजातील अतिशय गरीब, गरजू, विधवा, दिव्यांग व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आदींचे आतोनात हाल होत होते. अशा विदारक परिस्थितीमुळे जीवन जगावे कि मरावे हा यक्ष प्रश्न सर्व सामन्य जनतेसमोर निर्माण झाला होता. त्यांना एक वेळचे पोटभर अन्न सुद्धा मिळत नाही. हि गोष्ट लक्षात घेउन उमरखेड येथील अहोरात्र निस्वार्थ समाजसेवेचे कार्य करणाऱ्या इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्थेने लोकांच्या मदतीचा विडा उचलला. पडत्या काळात लोकांना मदतीचा हात दिला. “राहत कोविड-19 चला दान करुया” या उपक्रामा अंतर्गत संस्थेने 47 गावामध्ये 1277 राशन व किराणा कीट जिव्हाळा च्या स्वनिधीतून, विविध दान शूर संस्थेच्या निधीतून व स्थानीक लोकसहभागातून वाटप केल्या आहेत. संस्थेच्या महिला बचतगट सदस्यांना मास्क बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देऊन 6700 मास्क तयार करून मोफत वाटप करण्यात आले आहे. आरोग्य विभागास 7PPE किट वाटप केले, गावो-गावी, खेड्या-पाड्यात, वस्ती, तांडा आदी ठिकाणी जाऊन कोरोना ( कोविड १९) विषाणू या महामारी विषयी संस्थेच्या स्वयंसेवकांनी जनजागृती केली आहे. वारंवार स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखाविले आहे. कर्तव्यावर असणाऱ्या आशा ताई व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांना, पत्रकार बांधवाना मास्क व सॅनिटायझर वाटप केले आहे. बाजारपेठ व बँक परिसरात जाऊन शारीरिक अंतर कसे ठेवावे आदी विषयी प्रात्यक्षिक करून दाखविले आहे.कोरोना विषयी समाजविघातक अफवा पसरवू नये या विषयी जनजागृती केली आहे. स्थलांतरीत नागरिकांसाठी गावी परत येण्यासाठी प्रयत्न व मदत, परराज्यात व स्वराज्यात पायी जाणाऱ्यांना मजुरांना अन्न, पाणी व फळ वाटप, बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना शासकीय रुग्णालयात नेऊन त्यांची तपासणी करणे, व कोरनटाईन सेंटर ला ठेवणे तसेच त्याठिकाणी आवश्यक ती त्यांची मदत करणे, ग्रामीण भागातील महिलांना मासिक धर्म जनजागृती व 2000 पॅडचे वाटप करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर आयोजित करून 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 776 विध्यार्थ्यांना नोट,पेन व मास्क वाटप केले. दिवाळी चे औचित्य साधून जिव्हाळ्याची गोड दिवाळी या उपक्रमा अंतर्गत 785 च्या वर झोपडपट्टीतील अतिशय गरीब गरजू मुलांना, उस तोड कामगारांच्या मुलांना, भिकारी, मनोरुग्णांना आदींना फराळ व दिवाळी साहित्त्य वाटप केले आदी उपक्रम जिव्हाळा संस्थेने राबविले आहेत. यावेळी उमरखेड चे उपविभागीय अधिकारी स्वप्नीलजी कापडनिस, जिल्हाधिकारी यांचे पी.ए लिंगमपले, आनंद चिलगिलवार उपस्थित होते. सदरील पुरस्कार जिव्हाळा संस्थेला मिळाल्यामुळे संस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.