वाय फाय ला एक किलोमीटरपर्यंत रेंज मिळणार कसे असेल नवे तंत्रज्ञान
वायफायला 1 किलोमीटरपर्यंत रेंज मिळणार, कसे असेल नवे तंत्रज्ञान..?
📳 वायफाय तंत्रज्ञान आता सगळ्यांच्याच परिचयाचे झालेय. मात्र, वायफायच्या रेंजला मर्यादा असल्याने अनेकदा इंटरनेट स्पीड मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जातात. पण, आता त्यावरही तोडगा सापडला आहे.
📡 वायफायच्या नव्या तंत्रज्ञानामुळे आता चक्क 1 किलोमीटरपर्यंत उत्तम रेंज मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. वायफायच्या या नव्या तंत्रज्ञानाचे नाव आहे, वायफाय हेलो (Wi-Fi Halow).. या नव्या तंत्रज्ञानामुळे कुठेही 1 किलोमीटरपर्यंत चांगली रेंज मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
📲 सक्षम उपकरणांसाठी कमी ऊर्जा, उच्च कार्यक्षमता नि अधिक सुरक्षित सेवा मिळणार आहे. बँडविड्थच्या बाबतीत 2.4Ghz ते 5Ghz स्पेक्ट्रमवर वायफाय चालत असते. मात्र, वायफाय हेलो 1Ghz पेक्षा कमी स्पेक्ट्रमवर ऑपरेट करण्यासाठी विकसित केलेय. त्यामुळे ते कमी ऊर्जा वापरेल.
⁉️ *कधीपर्यंत सेवा सुरु होणार…?*
दूरवर डेटा प्रसारित करण्यासाठी हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरणार आहे. तथापि, इंटरनेट ऑफ थिंग्ज डिव्हाइसेस आणि उत्पादनांना खरोखरच अल्ट्रा-फास्ट वाय-फाय गतीमुळे कमी डेटासह हे चांगले काम करु शकेल. पुढील वर्षी ही सेवा सुरु होण्याची आशा आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.