साई समर्थ इन्फ्रास्पेस एल एल पी . मार्केट मधील गाळा क्र . बि१३ मध्ये अवैद्य व्यवसायास परवानगी देऊ नये गाळाधारकांची पत्रकार परिषेदेत मागणी

साई समर्थ इन्फ्रास्पेस एल एल पी . मार्केट मधील गाळा क्र . बि१३ मध्ये अवैद्य व्यवसायास परवानगी देऊ नये गाळाधारकांची पत्रकार परिषेदेत मागणी

youtube

साई समर्थ इन्फ्रास्पेस एल एल पी . मार्केट मधील गाळा क्र . बि१३ मध्ये अवैद्य व्यवसायास परवानगी देऊ नये

गाळाधारकांची पत्रकार परिषेदेत मागणी

प्रतिनिधी
उमरखेड

: माहेश्वरी चौकातील
नांदेड रोडवर असलेल्या

. नरेंद्र शिवप्रसाद जयस्वाल यांना साई समर्थ इन्फ्रास्पेस एल.एल.पी. उमरखेड च्या साई समर्थ आर्केड मधील बेसमेन्टमधील दुकान गाळा क्रं. १३ मध्ये बीअर शॉपी FL-II सुरू करण्यास परवानगी दिल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये काळा धारकांनी मांडली असून. साई समर्थ इन्फ्रास्पेस एल.एल.पी. उमरखेड चे डेसीग्नेटेड पार्टनर . दिलीप मधुकर आडे हे असुन, त्यांनी व त्यांचे पार्टनर यांनी उमरखेड येथे साई समर्थ आर्केड या नावाने व्यावसायिक व्यापारी संकुलाची निर्मीती केली आणि सदर व्यापारी संकुलामधील दुकान गाळे वेगवेगळ्या व्यापारी लोकांना मालकीहक्काने विक्री केली सदर दुकान गाळ्याचे खरेदीखत गाळाधारकांचे नावाने लिहुन नोंदवुन देतांना सदर संपुर्ण व्यापारी संकुलातील दुकान गाळ्याचे खरेदीखताचे दस्तऐवजामध्ये दिलीप मधुकर आडे यांनी “वाईन बार, वाईन शॉप, देशी दारुचे दुकान, कॅन्टीन, मटन खानावळ, मटका, कल्ब असे गर्दी होणारे व गर्दीतुन सामान्य नागरीकांना व गाळे धारकांना त्रास होणारे असे व्यवसाय करता येणार नाही अशी अट नमुद करून गाळे विक्री करुन खरेदीखत लिहुन नोंदवुन दिले आहे.
मुळ गाळा मालक दिलीप मधुकर आडे यांनी गाळा क्रं. १३ हा बियर शॉपी करीता श्री. नरेंद्र शिवप्रसाद जयस्वाल रा. उमरखेड यांना विक्री केला असुन, त्यांनी आपल्याकडे बियर शॉपी करीता प्रस्ताव सादर केलेला आहे. सर्व गाळे धारकांना खरेदीखतातील अटी व शर्ती लागु व बंधनकारक आहेत. एखाद्या वेळी नरेंद्र जयस्वाल यांना खरेदीखत करुन देतांना चुकीने अटी व शर्ती टाकण्यात आली नसेल तरी प्रत्येक गाळाधारकासोबत सौदा करतांना प्रत्येक ग्राहकास अटीतील व्यवसाय करता येणार नाहीत असे सांगितले होते. गाळा धारक क्र. ४. ५. २८ व इतर गाळेधारकांनी नरेंद्र जयस्वाल यांना कोणत्याही प्रकारचे नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. दारु बंदी कायद्यानुसार कोणत्याही नविन देशी, विदेशी, बियर व वाईन शॉपचा परवाना मागणाऱ्या व्यक्तीस परवाना देतांना व्यवसायाच्या ठिकाणाच्या चतु सिमेतील नागरीकांची तसेच व्यावसायीकांचे नाहरकत प्रमाणपत्र कींवा संमती घेणे आवश्यक आहे. साई समर्थ आर्केड या व्यापारी संकुलामध्ये वैद्यकीय सेवा, आईसक्रीम पार्लर, टेलरींग, स्वीट मार्ट, ड्रेसेस, फुटवेअर सेन्टर असे महिलांशी निगडीत असलेले व्यवसाय चालतात. त्यामूळे तसा या ठिकाणी श्री. नरेंद्र जयस्वाल अथवा इतर कोणासही परवाना दिल्यास त्या ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तींची गर्दी होवुन त्या ठिकाणी कायदयाचा प्रश्ण निर्माण होऊन गैरकायदेशीर प्रकाराला चालना सुद्धा मिळत्याची शक्यता नाकारता येत नाही. दवाखाने बाजुलाच असल्यांने रुग्नाना व सेवेला बाधा पोहचु शकते त्यापासुन महिला, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थीनी ग्राहकांना त्रास होणार आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करू असे पत्रकार परिषदेत प्रमोद देशमुख, विष्णू शेळके, अरविंद देशमुख, राजेश ठाकूर पराग तृप्तेवार, मोहम्मद शाकीर ,शुभम दूधेवार, किशोर देशमुख ,ओम दुधेवार, सुरज बोकन यासह २६ गाळेधारकांनी यांनी स्पष्ट केले आहे यानंतरही परवानगी दिल्यास होणाऱ्या परीणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गाळेधारकांनी दिला आहे

चौकट : B -13 हा गाळा सध्या बंद स्थितीत असून काही गाळेधारकाचे म्हणणे आहे की, त्यामध्ये अवैध दारू साठा संबंधित गाळे मालकांनी ठेवलेले आहे यावर सुद्धा प्रशासनाने कारवाई करावी

चौकट -2
यासंबंधी गाळेधारकांनी जिल्हाधिकारी यवतमाळ ,राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ ,राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पुसद, पोलीस अधीक्षक यवतमाळ, तहसीलदार उमरखेड, मुख्याधिकारी नगरपरिषद, पोलीस स्टेशन उमरखेड यांना निवेदनही दिले आहे

 

Google Ad
Google Ad

2 thoughts on “साई समर्थ इन्फ्रास्पेस एल एल पी . मार्केट मधील गाळा क्र . बि१३ मध्ये अवैद्य व्यवसायास परवानगी देऊ नये गाळाधारकांची पत्रकार परिषेदेत मागणी

  1. This webpage is fabulous. The superb information shows the maker’s earnestness. I’m dazed and envision additional such incredible presents on.

  2. I am not sure where youre getting your info but good topic I needs to spend some time learning much more or understanding more Thanks for magnificent info I was looking for this information for my mission

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group