प्रहारचे शोले स्टाईल आंदोलन भर पावसात.

youtube

दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्यापूर्वी आकाशवाणी केंद्र सुरू करा.

प्रहारचे शोले स्टाईल आंदोलन

उमरखेड{प्रतिनिधी}
दि.31_ऑगस्ट

येथील दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश प्रसारभारतीने दिले असून त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष उमरखेड यांनी दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याच्या अगोदर येथील मंजूर असलेले आकाशवाणी केंद्र सुरू करा अशी मागणी केंद्रीय मंत्री सूचना व प्रसारण अनुरागसिंह ठाकूर यांना उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात केली होती.
दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी सदर प्रक्षेपण केंद्र बंद होत असल्याने तालुक्यातील अनेक टीव्ही संचावर यापुढे दूरदर्शनचे थेट कार्यक्रम दिसण्यास अडथळा निर्माण होणार आहे .तर सन 2015 मध्ये मंजूर झालेल्या एफएम केंद्राला सहा वर्षानंतरही सुरुवात न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
यात मनोरंजन कृषी विषयक माहिती, बातम्या व कोरोणा महामारी शाळा शाळा बंद झाल्या मुळे दूरदर्शन च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आला होता .त्यापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागणार आहे.
येथील आकाशवाणी केंद्र 3 फेब्रुवारी 2015 मध्ये मंजूर झाले असून उमरखेड आणि हिंगोली साठी तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी प्रयत्न करून आकाशवाणी केंद्र आपल्या लोकसभा मतदारसंघात खेचून आनलेत. त्यापैकी हिंगोली येथील आकाशवाणी केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे.तर उमरखेड येथे अजून कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही.
त्यातच येथे असलेले दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय सूचना व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे.याला आता तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला असून सदर प्रक्षेपण केंद्र बंद करण्याच्या अगोदर येथील मंजूर असलेले आकाशवाणी एफएम केंद्र सुरू करावे व नागरिकांना सुविधा पुरवाव्यात याकरिता नागरिकांनी प्रसार भारती ला निवेदन देऊन प्रहार ने विनंती केली आहे.
पण त्यांनी दखल न, घेतल्याने आज दूरदर्शन केंद्र उमरखेड आंदोलन चालू केले,व ‘प्रहार’ पदाधिकारी सय्यद माजिद, प्रवीण इंगळे,अविनाश दुधे,यांनी चक्क आकाशवानी केंद्र टॉवर वर चढून,घोषणाबाजी केली. जोपर्यंत संबंधित विभाग आम्हाला, एफएम केंद्र तोपर्यंत चालू करण्याचे लेखी आश्वासन देत नाही नाही, तो पर्यंत मागे हटणार नाही व आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा, ‘प्रहार’ जनशक्ती पक्ष उमरखेड तालुक्याच्या वतीने देण्यात आला, ‘प्रहार’चे शहर प्रमुख राहुल मोहितवार,तालुका प्रमुख सय्यद माजित,सय्यद पाशा, अंकुश पाणपट्टे, प्रवीण इंगळे, अभिजित गंधेवार, विवेक जळके, व आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

*फोटो*

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!