जिव्हाळा संस्था’युथ आयकॉन अवार्ड 2021′ पुरस्काराने सन्मानित.

youtube

जिव्हाळा संस्था “युथ आयकॉन अवार्ड 2021” पुरस्काराने सन्मानित

उल्लेखनीय अविरत कार्याचा गौरव

उमरखेड ता. प्र. :-
इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा बहु.संस्था उमरखेड जि. यवतमाळ महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या कमी कालावधी मध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या सामाजिक क्षेत्रा मध्ये मागील 10 वर्षा पासून महाराष्ट्रातील यवतमाळ, हिंगोली, नांदेड, वाशिम व वर्धा या जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला व बाल विकास , स्वागत स्त्री जन्माचे (लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा ) आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, उपजीविका, जैवविविधता, कृषी व ग्रामविकास, मानवी हक्क, बालहक्क, बेरोजगारी, सिंचन, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियाना च्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील सात तलावातून गाळ उत्खनन करून शेतकरी बांधवाना मोफत गाळ वाटप केला आहे. त्या उत्खनना मुळे आज शेकडो लिटर जल साठा होऊन दुष्काळावर मात करण्यात संस्थेला फार मोठे यश प्राप्त झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात या अभियानात भरीव कार्यामुळे जिव्हाळा संस्था प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे. तसेच कोरोना ( कोविड 19 ) विषाणूच्या जीवघेण्या महामारीने मागील मार्च २०२० पासून संपूर्ण विश्वात थैमान घातले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहिर केला होता. लॉकडाऊन काळातील परिस्थितीने सर्वत्र वाताहत उद्भवली होती. आशा परिस्थित जीवन जगतांना समाजातील अतिशय गोर गरीब, गरजू, विधवा, दिव्यांग व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आदींचे आतोनात हाल होत होते. अशा भयावह परिस्थिती मध्ये जीवाची पर्वा न करता जिव्हाळा संस्थे ने असंख्य कुटुंबाना राशन व किराणा कीट, मास्क व वाटप, जनजागृती, पायदळी जाणाऱ्या मजुरांना नास्ता पाणी व जेवण, रक्तदान शिबीर, जिव्हाळ्याची पाठशाला उपक्रमा अंतर्गत शालेय साहित्य वाटप व मोफत शिकवणी वर्ग, जिव्हाळ्याची गोड दिवाळी अतर्गत दिवाळी फराळ वाटप, जिव्हाळा मायेची ऊब या उपक्रमा अतर्गत शेकडो लोकांना ब्लॅंकेट वाटप, अनाथ मुलींच्या शिक्षणा साठी मदत, ग्रामीण व शहरी भागात कोरोना लसीकरण जनजागृती या सारखे अनेक उपक्रम संस्था अविरत पणे राबवीत आहे. समाजातील सर्व उपेक्षित घटकांसाठी अहोरात्र कार्य करणारी निस्वार्थ संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या सर्व सामाजिक उलेखनीय कार्याची दखल घेऊन हा मानाचां राष्ट्रीय सन्मान मोठ्या दिमाखदार सोहळयात नॅशनल ह्युमन वेल्फेअर कोन्सिल दिल्ली व युवभाग्य फुडस प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने बाबुराव धनवटे सभागृह नागपूर येथे शासनाचे व प्रशासनाचे सर्व नियम पाळून पंजाब आटी सेल उपाध्यक्ष प्रतिक आलूवालिया, सुप्रसिद्ध अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद चे नरेश गडेकर, शीला सांभारे, नॅशनल ह्युमन वेल्फेअर कोन्सिल दिल्ली चे चेअरम चेअरमन गुंजन मैहेता, युवभाग्य फुडस प्रोड्युसर कंपनी चे चेअरमन युवराज ठाकरे , महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजीव शर्मा आदी मान्यवरांच्या हस्ते जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल लता राम मादावार यांना सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह या स्वरुपात मोठ्या दिमाखदार सोहळयात या स्वरुपात “युथ आयकॉन अवार्ड 2021” जिव्हाळा संस्थेस हा मानाचा राष्ट्रीय सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी भारत देशातून विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमा चे संचलन गुंजन मैहेता यांनी केले तर आभार सलीम सर यांनी मानले यांनी मानले.

चौकट
संस्थे चे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतातून संस्थे च्या कार्याला उजाळा दिला. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात हा राष्ट्रीय मानाचा सन्मान प्रथमच जिव्हाळा संस्थेस प्रदान केला त्या बद्दल नॅशनल ह्युमन वेल्फेअर कोन्सिल दिल्ली व युवभाग्य फुडस प्रोड्युसर कंपनी चे शतशः आभार मानले जिव्हाळा संस्थेस सहकार्य करणारे सर्व जिव्हाळा योद्धे (स्वयंसेवक) , पत्रकार, अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी, सर्व दानशूर व्यक्ती संस्थेस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानले, यावेळी ते म्हणाले की, प्रेरणादायी लोकांचा सहवास, त्यांच्या शाबासकीची थाप, त्यांच्या शब्दाशब्दातून लढण्याची आणि जगण्याची मिळणारी दिशा अगदी सर्वकाही ऊर्जा वाढवणारं..! हा सन्मान आत्मविश्वास आणि आत्मप्रेरणा वाढवणारा..!”

अतुल लता राम मादावार
अध्यक्ष –जिव्हाळा संस्था

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!