“कियारा” ची इंडिया बुक आँफ रेकॉर्ड मध्ये नोंद.

अडीच वर्ष वयाच्या ‘कियारा’ ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद
उमरखेड :- येथील सुप्रसिद्ध नोटरी वकील अॅड. राजेश्वर रायेवार यांची अडीच वर्ष वयाची नात “कियारा केतकी निलेश रायेवार” चे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्सने नोंद घेऊन नुकतेच कौतुक केले आहे.
महाराष्ट्रातील पुणे येथील कियारा केतकी निलेश रायेवार (जन्म 17 जानेवारी 2019) या छकुलीने 45 घरगुती वस्तू, 10 वाहने, इंग्रजी वर्णमाला, नकाशावर 14 देश, 16 झेंडे, 26 प्राणी, शरीराचे 17 भाग, 13 अन्नपदार्थ, 1- 10 मोजणी (जर्मन, इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये), 1-20 मोजणी (मराठी आणि संस्कृतमध्ये), 29 देशांच्या राजधानी, 8 प्राण्यांचे आवाज,एका वर्षातील महिने (इंग्रजी आणि मराठीमध्ये), कोडे सोडवणे, भारतातील प्रसिद्ध आणि धार्मिक स्थळे, सौर मंडळाच्या वस्तू, विरुद्धार्थी शब्द आणि राष्ट्रीय चिन्हे ओळखणे, तसेच 2 वर्षे 5 महिने वयाच्या सामान्य ज्ञानाचे प्रश्न पटापट सांगून कियारा ने आपली इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्सने मध्ये 12 जुलै 2021 रोजी नोंद केली आहे.
याशिवाय, ती सर्व भाज्या, फळे, आकार, रंग, घरगुती आणि वन्य प्राणी देखील ओळखते, तसेच ती आवर्त सारणीचे 35 रासायनिक घटक आणि 5-6 यमक वाचू शकते, तसेच तिला भारताची सर्व राज्ये-राजधानी इ. मूकपाठ आहेत. अवघ्या अडीच वर्षे वयाच्या असलेल्या कियारा ने आपल्या तल्लख बुद्धीने सर्वांना चकित करून सोडले. याची नोंद घेण्यात आली असून उमरखेड येथील अॅड. राजेश्वर रायेवार यांच्यावर समाज माध्यमातून आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कियारा इथेच थांबू नको तुला खूप पुढे जायचे आहे. तु प्रत्येक गोष्ट प्रयत्नांच्या बळावर साध्य करू शकते हे सिद्ध करत रहा अशा शुभेच्छा देखील कियारा वर होत आहे.