चातारी च्या महिला संरपच रंजना माने यांच उपोषण समाप्त.

youtube

चातारी च्या महीला सरपंच रंजना माने याचे उपोषन समाप्त

( जि. प. उपाध्यक्ष व गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने सांगता )

उमरखेड : – चातारी येथील सरपंच रंजना माने यांनी पं स समोर आपल्या विविध मागण्यासंदर्भात सुरू केलेले आमरण उपोषणाची आज 27 रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रांती कामारकर यांच्या उपस्थीतीत गटविकास अधिकार यांच्या लेखी आश्वासनाने यशस्वी सांगता झाली .
सहाय्यक गट विकास अधिकारी अमोल चव्हाण यांची अन्य ठिकाणी बदली करने , खुल्या पद्धतीने गांव विकासासाच्या कामासाठी ई निविदा पद्धती स्तरावर राबविने , सरक्षंन भिंत बांधकाम अपहार झालेल्या व अन्य कामात अपहार झालेल्या रक्कमेची रिकव्हरी जो पर्यंत पुर्ण पणे शासन स्तरावर होत करावी या मागणी साठी सरपंच उपोषणास बसल्या होत्या .
आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता . त्यांची प्रकृती सुध्दा बिघडली होती त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला होता .
आज जि प उपाध्यक्ष क्रांती कामारकर यांनी उपोषण मंडपास भेट देऊन उपोषण कर्ताशी चर्चा केली व गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे यांनी लेखी आश्वासन दिले त्यामध्ये सहाय्य्क गटविकास अधिकारी अमोल चव्हाण यांचा विडूळ सर्कलचा पदभार काढण्यात येऊन दुसऱ्या कडे दे०यात येईल ,संरक्षण भिंत बांधकाम अनियमीतता व भष्ट्राचार झाल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच , सचीव व शाखा अभियंता यांचे कडून ऐका महीन्यात बांधकाम करुन घेण्यात येईल अन्यथा संबधीतावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात यईल , ई निविदा प्रक्रियेत पंचायत समीती हस्तक्षेप न करता सरपंच सची वाने कार्यप्रणाली राबवावी तसेच सरपंच सचीव यांच्या डिएसीने ई निविदा नियमानुसार राबविण्यात यावी असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले .
यावेळी पं स सभापती प्रज्ञानंद खडसे , जि प सदस्य पंकज मुडे , देविदास खोकले , प्रा वि ना कदम , कल्याणराव माने , पं. स. सदस्य गजानन सोळंके , शंकर जाधव शंकरराव तालगंकर , शिवाजी माने , विलास चव्हाण , रविंद्र जैन , शि. ना.माने , भिमराव पाटील , श्रीराम नलवाडे , बळवंत चव्हाण , अमोल माने सह चातारी येथील महिला व नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते .

.
_____________________

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!