महामानव बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी पुसद
महामानव बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
पुसद
क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य दरवर्षी बिरसा मुंडा ब्रिगेड च्या वतीने अभिवादन रॅलीचे आयोजन होत असते परंतू यावर्षी कोविड 19 रोगाची गंभीरता आणि महाराष्ट्रात निर्माण झालेले धार्मिक असहिस्णुतेचे वातावरण लक्षात घेता अभिवादन रॅली व मोटार सायकल रॅली रद्द करून दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता क्रांतिवीर बिरसा मुंडा चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता
या अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात पुसद च्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ अनिताताई मनोहरराव नाईक,आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी, ॲड आशिष देशमुख, आमदार निलय नाईक, पुसद अर्बन बँक अध्यक्ष शरद मैंद, आदिवासी विकास परिषद विदर्भ महा सचिव डॉ.आरतीताई फुपाटे, बिरसा मुंडा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, बिरसा ब्रिगेड च्या महिला अध्यक्ष सुनीताताई मळघने, शांताबाई बेले, गोकुळा बोडखे, मीना व्यवहारे, मनीषा बेले, पंचफुला इंगळे, कुसुम मारकड, पार्वताबाई आस्वले, उषा टारफे, महानंदा वंजारे, सुनिता जंगले, पुष्पा वंजारे, सौ कमलाताई देवकर, संगीता तोडकर, सविता धनवे, नंदा हगवणे, रेखा आमले, पुनम व्यवहारे, सुनिता रिठे, वर्षा खराटे, चंदा तडसे, प्रभावती रणमले, सीमा वैद्य, रुख्मिना बुरकुले, अरुना ढोले, विभा भरकाडे, पंचायत समिती सभापती छायाताई हगवणे, जी.प.सद्स्य गजानन उघडे नगरसेवक विष्णू शिकारे, परसराम डवरे, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन हगवणे, वसंत चिरमाडे, भास्कर मुकाडे, किसन भुरके, जीवन फोपसे,सुनील ढाले, दादाराव चिरंगे, हरिदास बोके,सखाराम इंगळे गजानन भोगे, संदेश पांडे, संजय डुकरे, अक्षय व्यवहारे, पंकज वंजारे, अतिश वाघमारे, नाना बेले, शरद ढेंबरे
व सर्व समाजातील सामाजिक संघटनांचे अध्यक्ष व सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला
दिवसभर महामानव बिरसा मुंडा यांना मानणाऱ्या व त्यांच्या विचारावर कार्य करणाऱ्या तमाम समाज बंधू भगिनींनी मोठ्याप्रमाणात अभिवादन करण्यासाठी उपस्थिती जमली होती.
कार्यक्रमाचे सुरुवातीला बिरसा यांच्या क्रांतिकारक कार्याची महती सांगणारे बिरसा गीत कुमारी दिपाली चीरंगे यांनी सादर केले व स्वागत गीतानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीरसा ब्रिगेड चे मार्गदर्शक सुरेश धनवे यांनी तर उपस्थितांचे आभार मारोती भस्मे, अध्यक्ष बिरसा मुंडा ब्रिगेड तालुका पुसद यांनी मानले.