माहूर शहरातील बहुचर्चित मास विक्रीची दुकाने नगर पंचायतीने हटविली

youtube

माहूर शहरातील बहुचर्चित मास विक्रीची दुकाने नगर पंचायतीने हटविली

आबासाहेब पारवेकर मार्केट मधील समस्या मात्र कायम

श्रीक्षेञ माहूर – (प्रतिनीधी) नितीन तोडसाम

माहूर शहरात मुख्य रस्त्यावरील व आबासाहेब पारवेकर मार्केट यार्ड मधील उघड्यावर मास विक्री मुळे या परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने परीसरातील रहिवाश्यांनी आरोग्यास धोका होत असून दुर्गंधी निर्माण झाल्याचे सांगून सर्व हे व्यवसाय हटवण्यात यावेत म्हणून परिसरातील रहीवाश्यांनी व महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने दिली होती या निवेदनाची नगर पंचायत प्रशासनाने दखल घेऊन दि.७ जून रोजी किनवट माहूर रस्त्यावरील उघड्यावर मास विक्री करणारे दुकाने त्या दुकानातील साहित्य जप्त केल्याने माहूर शहरातील अतिक्रमण धराकांचे धाबे दणाणले असून आबासाहेब पारवेकर मार्केट मधील चिकन सेंटर ची समस्या मात्र कायम आहे.

माहूर शहराला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे.देवभूमी,संतभुमी असलेल्या शहरात ठिकठिकाणी सर्रास विनापरवानगी मांस विक्री केली जात असते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगर पंचायत आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी निवेदन कर्त्यांची होती .दरम्यान, शहरातील तहसील रस्ता आणि किनवट रस्त्यावर रस्त्याच्या बाजुला मांस विक्रेते घाण टाकत असतात. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वास्तविक पाहता सार्वजनिक आरोग्याला बाधा पोहोचवणाऱ्या उघड्यावर मांस विक्रीला लगाम लावण्यासाठी मांस विक्रेत्यांवर फौजदारी दाखल करता येऊ शकते किंवा नगर पंचायत दंडात्मक कारवाई सुद्धा करू शकते. परंतु कोणत्याही कारवाया प्रशासन करत नाही.मांस विक्रेते उर्वरित निकामी मांस, रक्त, आतडे व कातडे मोकळ्या जागेत फेकून देतात, प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने बोंबा मारो आंदोलन चा इशारा दिला होता,आंदोलनाची दखल घेऊन आज मंगळवारी नप कडून माहूर शहरातील भंगार दुकाने शहराबाहेर हटविण्याबाबत नोटीस देऊन २० दिवस होऊन गेले तरी सुध्दा भंगार दुकाने शहरा बाहेर हलविले नसल्यामुळे नगर पंचायत माहूरच्या कर्मचारी पथकाकडून दुकानातील साहित्य जप्त करण्यात आले.यावेळी न.पं कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी , सुनिल वाघ, देविदास जोधंळे,देविदास सिडाम,विशाल ढोरे,विजय शिंदे,सुरेंद्र पांडे,गणेश जाधव,नय्युम पाशा व इतर कर्मचाऱ्यांचा पथकात समावेश होता.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!