मेट ग्रामपंचायत संरपच प्रविना विक्रम राठोड याची बिनविरोध निवड.
मेट ग्रामपंचायच्या संरपच पदी प्रविना विक्रम राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.
मेट ….
राजकीय क्षेत्राचा पुरेसा अभ्यास नसतांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनुभव असलेल्या सर्व जुने गाव पुढारी चा पराभव करून सर्वांनाच आच्छर्याचा धक्का दिला. 21 वर्षीय सूनेने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.
मेट ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व आजी माजी पुढारी असलेल्या लोक सेवा महाविकास आघाडी पॅनलसमोर मा.श्री. उत्तमराव मोहनसिंग राठोड माजी सैनिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ यांच्या नवी दिशा नवे पर्व पॅनलने आव्हान उभे केले होते . गावातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचे व पुढारी पॅनल विरुद्ध एकटे श्री उत्तमराव मोहनसिंग राठोड माजी सैनिक हे निवडणूक लढवत असल्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली होती. या निवडणुकीत उच्च शिक्षित असलेल्या सुन सौ. प्रविणा विक्रम राठोड यांच्या लढतीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते.
आजी माजी सर्व पुढारी यांना नाकारत सुनेला कौल सर्व पुढारी विरूद्ध एकटे श्री उत्तमराव मोहनसिंग राठोड यांच्या लढतीमुळे मतदान कोणाला करायचे असा प्रश्न मतदारांसमोर उभा राहिला होता. मतदारांनी सर्व आजी माजी गाव पुढारी ऐवजी उच्च शिक्षित असलेल्या सुनेला व इतर 6 सदस्य अश्या एकूण 9 पैकी 7 सदस्यांना प्राधान्य देऊन या लढतीत सौ.प्रविणा विक्रम राठोड यांनी विरोधकाला 129 मतांनी पराभव केला. मतदारांनी देखील सर्व आजी माजी गाव पुढारी ऐवजी उच्च शिक्षित असलेल्या व राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सुनेच्या बाजूने कौल दिला. तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापित उमेदवारांना नाकारून नवीन आणि युवा उमेदवारांना प्राधान्य दिल्याचे निकालावरून स्पष्ट होते. मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला सेवा करण्याची संधी दिली आहे. मी उच्च शिक्षित असून माझ्या शिक्षणाच्या माध्यमातून माझे सासरे मा.श्री. उत्तमराव मोहनसिंग राठोड व माझे पती श्री विक्रम उत्तमराव राठोड यांच्या मदतीने समस्या सोडवून संपूर्ण गावाचा विकास करणार असल्याची प्रतिक्रिया प्रविणा राठोड यांनी व्यक्त केले.यावेळी निवडणूक अधिकारी व ग्रामसेवक यांनी काम पहिले तसेच उपस्थित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गजानन शेषराव चव्हाण .सुभाष वसराम चव्हाण. प्रविना विक्रम राठोड. बालकाबाई जळबा काळे. गणेश मंगलसिंग चव्हाण .सिमा हेमंत जाधव. संगीता अरविंद राटोड , हे उपस्थिती होते. मा.श्री. उत्तमराव राठोड माजी सैनिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ , मा.श्री.प्रेमसिंग मंगलसिंग नाईक अध्यक्ष तंटामुक्त मेट ,श्री रमेश कनीराम राठोड , श्री.विक्रम उत्तमराव राठोड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यवतमाळ, श्री. विजय शेषराव चव्हाण माजी सरपंच तथा अध्यक्ष शाळा समिती मेट ,श्री प्रल्हाद लखीचंद राठोड, श्री उत्तम हिरामण चव्हाणश्री. प्रकाश फकीरा चव्हाण,श्री.देवराव रोडा राठोड, श्री.गणेश वसराम राठोड, श्री. गणेश भाऊराव जाधव,श्री नामदेव रोडा आडे, श्री रोहिदास सीताराम जाधव ,श्री नरेंद्र तुळशीराम राठोड, श्री राहुल रामराव राठोड, सचिन प्रल्हाद राठोड, रामराव भोजू राठोड,विजय गंगाराम चव्हाण व नवनिर्वाचित ग्राम पंचायत मेट चे सर्व सदस्य तसेच व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.