कृष्णापुर तांडा तील प्रत्यक्ष समस्या जाणून घेण्यासाठी आमदाराचा नाल्याच्या पाण्यातुन बिना चप्पल चा प्रवास.

youtube

 

कृष्णा पुर तांडतील प्रत्यक्ष समस्या जाणून घेण्यासाठी आमदारांचा नाल्याच्या पाण्यातून प्रवास
कृष्णापुर तांडा….

रस्ता भूमिपूजन करण्यासाठी काल कृष्णापुर येथे गेले असता कृष्णापुर तांडा येथील महिला नी रस्त्याची व्यथा मांडण्यासाठी आमदार नामदेवराव ससाने यांची भेट घेतली . सतत वाहणाऱ्या नाल्यातुन ये जा करावी लागते तसेच तांड्याच्या विकासात्मक समस्याही मांडणाऱ्या महिलांच्या वाणीत आर्तता व अपेक्षा ही होत्या . आमदार साहेबानी त्यांची रास्त मागणी ऐकूण घेतली व प्रत्यक्ष काल कृष्णापुर तांडा येथे भेट दिली . नाल्यातुन वाहणाऱ्या पाण्यातुन पलिकडे जाण्यासाठी क्षणाचाही विचार न करता आमदार साहेबानी चप्पल काढली व पाण्यातुन समोर निघाले . अंत्यत सामान्य कुटूंबातून आलेल्या ससाने साहेबानी आमदार आसलो तरी मी सामान्यच आहे याचा परिचय आपल्या कृतीतुन दिला . हा सगळा प्रकार महिला व गावकरी बघत होते . ज्या महिला नी व्यथा मांडल्या होत्या त्या तर अचंबित झाल्या आम्ही व्यथा मांडल्यावर तत्काळ ससाने साहेब आले , नाल्यातुन अनवानी पायाने चालले व आमच्या समस्या सोडविण्याची शास्वती दिली त्यामुळे आनंदाश्रु त्यांचे डोळयात तरळत होते .आमदार ससाने साहेब म्हणाले जनता माझी मायबाप आहे, त्यांच्या हालअपेष्टा , दुःख याची जाण मला आहे . नामदेवराव ससाने आज आमदार असले तरी आपल्यातीलच सर्वसामान्य व्यक्ती असल्याचे श्री ससाने साहेब यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले .कृष्णापुर तांड्यातील रस्त्याचे जानेवारी महिन्यापर्यंत भूमीपुजन करून काम सुरू करण्याची ग्वाही त्यानी उपस्थितांना दिली .रस्ता पूर्ण करण्या बाबत आतापर्यंत कोनताही राजकीय नेता किंवा आमदार आमच्या पर्यंत येऊन आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही पण आज प्रत्यक्ष आमदार ससाने साहेब आमच्या दारी येऊन समस्या जाणून घेतल्या याबद्दल सर्वच वृद्धमहिला पुरुषांनी समाधान व्यक्त करत आज खऱ्या अर्थाने आमचा रस्ता होणार याची आम्हाला खात्री आहे अशा भावना व्यक्त केल्या याप्रसंगी श्रीधर पाटील देवसरकर, परमानंद पाटील कदम, विठ्ठल वानखेडे,विकू पाटील नलावडे ,ग्राम प सदस्य व ग्रामस्थ,मंडळी महिला उपस्थित होते

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!