त्या ‘ नराधमावर कडक कार्यवाही करा ! – आमदार ससानेंची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी.

youtube

‘त्या ‘ नराधमावर कडक कार्यवाही करा !
– आमदार ससानेंची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

प्रतिनिधी
उमरखेड :
उमरखेड मतदार संघातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत अजीजखान मोहम्मदखान पठाण याने 11 वर्षाच्या शाळकरी मुलीवर केलेल्या अत्याचारामुळे आरोपीवर कडक करण्यात यावी अशी मागणी आज १३ रोजी आमदार नामदेव ससाने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना प्रत्यक्ष भेटुन निवेदनातून केली आहे .

उमरखेड मतदार संघातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत 11 वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर अजीजखान मोहम्मदखान पठाण याने लैंगिक अत्याचार करून तिला जिवेमारण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पोलीसांनी अतिशय योग्य तपास करून 48 तासांच्या आंत आरोपीस जेरबंद केले. आरोपी हा विक्षीप्त स्वनावाचा असून त्याचेवर यवतमाळ, नांदेड व हिंगोली जिल्हयामध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त बलात्कार, हत्या, लुटपाट अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा

असल्यामुळे सदर प्रकरणात त्याला कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या उपरोक्त गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेकडे देवुन सदर प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्ती करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे. तसेच सदर घटनेतील साक्षीदार व पिडीतीच्या कुटूंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे व पिडीतेस शासनाच्या मनोधैर्य योजने अंतर्गत त्वरीत मदत करावी अशी मागणी आमदार नामदेव ससाने यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटुन पत्राद्वारे केली आहे .

चौकट :
घटना घडल्यानंतर आरोपी नराधमास पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते . घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सर्व ताकद पणाला लावीत एका दिवसात आरोपी नराधमास पकडले. हि कामगीरी करणाऱ्या पोलिस पथकास २५ हजार रुपयाचे व्यक्तिगत बक्षिस आमदार नामदेव ससाने यांनी जाहीर केले आहे .
सोबत फोटो :
प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून घटनेची माहिती देतांना आमदार ससाने

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!