शुल्लक कारणावरून धारधार शस्त्राने युवकाचा खुन.

youtube

शुल्लक कारणावरून धारधार शस्त्राने युवकाचा खुन
उमरखेड : – दि . ८
महात्मा फुले वार्डातील गोविंद सुभाष शिंदे (२७) याचा शुल्लक कारणावरून धारधार शस्त्राने वार करून खुन झाल्याची घटना मंगळवार रात्री ११ वाजता दरम्यान घडली असून पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे .
शिंदे परिवाराकडे देविच्या नवसाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक ७ रोजी आयोजीत करण्यात आला होता सायंकाळी ६ वाजता पासून जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला १० वाजता दरम्यान शेवटची पंगत चालू असतांना मुलांची हशी मज्जाक चालू होती . त्यावेळी धर्मा गायकवाड यांनी हशी , मज्जाक व आवाज कमी करा माझ्या घरातील लहान मुले झोपत नसल्याचे सांगून घरी परत गेला काही वेळाने करण गायकवाड , धर्मा गायकवाड व धिरज गायकवाड त्याठिकाणी आले व त्यांनी मृतकास धक्का बुकी करीत वाद घातला त्यावेळी नंतर करण याने घरातून धारधार शस्त्र (खजीर ) आनले व मृतकाच्या अंगावर सपासप वार केले .
गोविद यास तात्काळ शासकिय रुग्णालयात नेले असता डॉक्टरनी त्यास मृत घोषित केले .
पोलीसांनी करण भाऊराव गायकवाड ( २२ ) , धर्मा भाऊराव गायकवाड (२५) व धिरज भाऊराव गायकवाड (२०) यांना अटक केली असून पुढील तपास ठाणेदार शकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अमोल राठोड करीत आहेत .
चौकट

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!