बिटरगांवातील प्रा. विश्वजीत नरवाडे यांना पीएच.डी.प्रदान.

youtube

बिटरगांवातील प्रा. विश्वजीत नरवाडे यांना पीएच.डी. प्रदान.

ढाणकी –

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव या विद्यापीठा अंतर्गत प्रा. विश्वजीत नरवाडे यांना नुकतीच अर्थशास्त्र विषयामधील “औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय विकास योजनांचे अादिवासीच्या आर्थिक विकासातील योगदान : एक अभ्यास” या मथळ्याखालील शोधप्रबंधासाठी नुकतीच पीएच.डी. प्रदान झालेली आहे.

बिटरगांव बु हे गांव सामाजिक, राजकिय, शैक्षणिक व ऐतिहासिक चळवळीमध्ये सबंध्द यवतमाळ जिल्ह्यामध्ये नावलौकीक मिळविलेले, पैनगंगेच्या जवळच वसलेले, जवळपास अंदाजे सहा हजार लोकसंख्येचे गांव आहे. गांवाला लागूनच घनदाट पैनगंगा अभयारण्य आहे. तीन बाजूंनी पाणी असलेले हे महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी पैनगंगा अभयारण्याची स्थापना ही १ जानेवारी १९१६ ला झाली. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ३२५ चौरस किलोमीटर आहे. जलाशयाने परिपूर्ण असलेल्या पैनगंगा नदीच्या तीरावर घनदाट पैनगंगा अभयारण्य आहे.

बिटरगांवात म्हणाव्या तेव्हड्या सुखसुविधा उपलब्ध नाहीत. रस्त्याची तर अतिशय दुरावस्था आहे. रस्त्याचे काम व्हावे म्हणून जनतेंनी वारंवार आंदोलन केले आहे. पण लोकप्रतिनिधीने सतत दुर्लक्ष करुन सुध्दा बिटरगांवातील जनतेने आपले भविष्य उज्वल करायचे सोडले नाही. त्यातही बिटरगांवामधील शांतीदूत बौध्द नगरी मधील प्रत्येक घरामधील एक किंवा दोन व्यक्ती सरकारी नौकरीला लागलेले आहेत, ही सर्वात मोठी आदर्श घ्यायजोगी विशेष बाब समजण्यात येते. त्यात विश्वजीत नरवाडे यांना समाजातील उच्चपदस्थ वरिष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा निश्चीतच वारसा मिळाला आहे.
घरामध्ये अठरा विश्व दारीद्र्य. वडील गोपिनाथ नरवाडे हे शेतकरी, आई पंचशिलाबाई नरवाडे हे घरकाम, शेतातील पडेल ती कामे करणे, त्या सोबतच सुरेल आवाजात भिम गीत गायनांची त्यांना फार आवड. कित्येक भिम गीते त्यांनी स्वत: लिहीलेली आहे. मुलांनी शाळा शिकली पाहीजे, डॉ. बाबासाहेबासारखे नांव कमावले पाहीजे, म्हणून पंचशीलाबाई मुलांना लहानपणापासूनच शिक्षणाचे बाळकडू पाजत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून देखील विश्वजीत नरवाडे शैक्षणिक प्रवाहामध्ये खचला नाही. गंजला नाही. तो मात्र शिक्षण घेत असतांनी झिजला. रात्रंदिवस कैक पुस्तके चाळीत, अभ्यास करत शैक्षणिक पदव्या मधील सर्वात उच्च पदस्थ पदवी पीएच.डी. हाशिल केली.

पीएच.डी. चा शोधप्रबंध लिहीत असतांनी विश्वजीत नरवाडे यांना सुरुवातीला स्वर्गिय प्रा. डॉ. जे. एम. अवथरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनानंतर प्रा. डॉ. किरण अमृत वारके यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले.

शिक्षण घेत असतांना प्रा. विश्वजीत नरवाडे यांना अनंत आर्थिक, सामाजिक, मानशिक यातना सहन कराव्या लागल्यात. श्री. अरविंद केशव राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले. लहाण भाऊ श्री. रणजीत नरवाडे पोलिस कॉन्स्टेबल,नांदेड येथे कार्यरत आहेत. घरामध्ये विश्वजीत नरवाडे मोठा भाऊ असून देखील रणजीत नरवाडे या लहाण भावाने जमेल तेवढी आर्थिक मदत केल्यामुळे मोठ्या भावाचा किरदार त्यांनी निभावला आहे. या सर्व परिस्थितीवर मात करीत तो अखेर यशस्वी ठरला.
त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा आढावा घेत असतांनी उच्च पदस्थ अधिकारी सुध्दा खुर्ची सोडून आदराचे स्थान देतो. त्यांचा शैक्षणिक प्रवास म्हणजे एम.ए.,बी.एड, टीईटी, सीटीईटी., नेट, जे.आर. एफ., एम. फील., पीएच.डी. इत्यादी.
प्रा. विश्वजीत नरवाडे सर सद्या श्री. गुरु हरकिसन ज्यूनियर कॉलेज , टिकमगड, मध्यप्रदेश या इंग्रजी सीबीएससी महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
प्रा. विश्वजीत नरवाडे यांना अर्थशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. नामांकीत पदवी मिळाल्यामुळे त्यांचे सर्वांकडून कौतूक होत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!