गोदावरी फाऊंडेशन ग्रुप ढाणकीच्या महिलांची स्मार्ट ग्रा.पं.नागापूरला भेट- उमरखेड

youtube

गोदावरी फाऊंडेशन ग्रुप ढाणकीच्या महिलांची स्मार्ट ग्रा.पं.नागापूरला भेट-

उमरखेड
सर्वांगीण विकासासाठी काम केलेल्या उमरखेड तालुक्यातील स्मार्ट ग्रामपंचायत नागापूरला ढाणकी नगरपंचायतीतील गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांची प्रगती साधणा-या प्रगतीशील महिलांनी नागापूर ग्रामपंचायतीला भेट दिली.प्रथमता त्यांनी संत गाडगेबाबा मोक्षधाम समितीला भेट दिली.स्मशानभुमीत म.गांधी रोजगार हमी योजनेच्या ६महिलांनी पुष टाकुन स्वागत करून चॉकलेट वाटप केले.स्मशानभुमीत स्मशानशेडपर्यंत जाण्यासाठी सिमेंट रस्ता, पुरुष -महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी व वृक्षांना पाणी टाकण्यासाठी सोलर पंप व हॅन्ड पंप, गांडूळ खत शेड, शहिदांच्या आठवणीसाठी बांधलेला आकर्षक शीलालेख,१५०० डौलदार झाडे, रंगीबेरंगी आकर्षक फुलझाडे, स्मशानभूमी टीन शेड, नव्याने बांधकाम सुरू असलेले सिमेंट काँक्रीट स्मशानभूमी शेड, स्मशानभूमीतील झाडांना पाणी टाकण्यासाठी पाइपलाईन,४ .१/२स्मशानभुमीला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते तशी कलरिंग असलेली चैनलिंग जाळी, तिरंगा गेट व आकर्षक टेकडी ,शेवट गोड होण्यासाठी चांगली व्यवस्था केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.नंतर मुख्यमंत्री -स्वच्छ शाळा सुंदर शाळा जिल्हा प्रथम पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली.उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रकाश शिंदे सर,छाया चाकोरे मॅडम, संदीप कवडे सर, स्वयंपाकनिस स्वयंपाकनिस वच्छला राठोड व विद्यार्थी विद्यार्थिनींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.शाळेतील सर्व वर्गांत सि.सि.टिव्ही. कॅमेरे, डिजिटल टीव्ही, वातानुकूलित पंखे, आकर्षक स्टाईल, रंगीबेरंगी आकर्षक फुलझाडे, शाळेच्या सौंदर्यात भर पाडणारा कारंजा, विद्यार्थ्यांनी मिळवलिले जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शिल्ड व प्रमाणपत्र, स्व. प्राचार्य अप्पारावजी कुरमे रंगमंच, सोलर पंप, सोलर हीटर, सोलर एनर्जी, संगीता आव्हाड स्वच्छता दूत अधिकारी कर्मचारी शौचालय, विद्यार्थी विद्यार्थिनी साठी अलग मुत्रीघर व शौचालय, विद्यार्थ्यांना संगणिककरणाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी १२ संगणक कक्ष, प्रोजेक्टर कक्ष, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी स्क्रीन बोर्ड, शाळा सुरुवातीपासून भरण्यासाठी व सुटण्यापर्यंत ऑटोमॅटिक रिंग बेल, डोळ्याला आकर्षण करणारी गड किल्ल्याची माहिती असणारे फोम बोर्ड,”जेवढे बसते पोटात तेवढेच घ्या ताटात”असा संदेश देणारे बोर्ड शाळेची भौतिक सुविधा व शैक्षणिक प्रगती पाहून महिलांनी आनंद व्यक्त केला.शाळेमधील ६विद्यार्थी महादीप परीक्षेमध्ये तालुकास्तरीय प्रथम परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गोदावरी फाउंडेशनच्या महिलांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्यात आले.
त्यानंतर महिलांनी हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांचे पूजन केले. तदनंतर आर .आर .पाटील यांच्या प्रेरणेतून यशवंतराव चव्हाण ग्राम समृद्धी योजनेत झालेल्या सिमेंट रस्त्याची पाहणी केली. गावात फेरफटका मारताना आरो प्लांट, अंगणवाडी, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासाठी घेतलेले सर्वसामान, गावकऱ्यांना लग्नकार्यासाठी, साखरपुड्यासाठी , मयत साठी लागणाऱ्या सर्व साहित्याची पाहणी केली. गावात झालेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत गाई म्हशीच्या गोठ्याची प्रशासकली. त्यानंतर 80 पायऱ्या चढून सर्व महिला गावकरी, विद्यार्थी, पदाधिकारी टेकडीवर बांधलेल्या राजीव गांधी भवन ची पाहणी केली. तेथे असलेल्या सार्वजनिक शौचालय, सोलर एनर्जी, सोलर हीटर, सोलर लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशामक, लाऊड स्पीकर व्यवस्था, स्वयंपाकाच्या भांड्याची व्यवस्था, टच स्क्रीन बोर्ड इत्यादी व्यवस्थापन पाहून भारावून गेल्यात. याच राजीव गांधी भवनला पुणे येथील यशदा प्रबोधिनींनी ग्रामपंचायत अध्ययन केंद्राची मान्यता दिली. राजीव गांधी भवन मध्ये 200 खुर्च्याची आसन व्यवस्था आहे. त्यांचा सर्व महिलांचा यथोचित अशा प्रकारचा सत्कार करण्यात आला. गावाची पाहणी केल्यानंतर शितल वर्मा, आशा कलाने, दुर्गा गारशेटवाड, अर्चना जयस्वाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन प्रकाश शिंदे सर तर प्रास्ताविक चितराव कदम सर यांनी केले. कार्यक्रमाला सविता कदम माजी सभापती, गोदाजी जाधव सरपंच, बापूराव कुरणे उपाध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्ती समिती, रामा जाधव माजी सरपंच, लताबाई जाधव ग्रामपंचायत सदस्य, प्रताप आडे रोजगार सेवक, ज्योती कदम ग्रामपंचायत ऑपरेटर, मारुती ठेंगे ग्रामपंचायत सेवक, कौशिक राठोड, चतुराबाई जाधव, कविता आडे,नीला जाधव, गोदावरी फाउंडेशनच्या मीना दिल्लेवार, रंजना पवार, गायत्री पद्मावार, सोनिया वर्मा, माधुरी मामीडवार,माया कस्तुरे,संध्या पिंपरवार सुनंदा कानझोडे व गावकरी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!