आता शंभर ऐवजी पाचशे रुपयांचा बॉण्ड घ्यावा लागणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामान्य जनतेला झळ पोहचणार ? उमरखेड

youtube

आता शंभर ऐवजी पाचशे रुपयांचा बॉण्ड घ्यावा लागणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामान्य जनतेला झळ पोहचणार ?

उमरखेड

विधानसभा निवडणूका जवळ येऊन ठेपल्यामुळे राज्य सरकार जनतेच्या हिताचे आणि जनतेला तीव्र झळ पोहोचवणारे निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेत आहे असाच एक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून तो शंभर रुपयांचा मुद्रांक (बॉण्ड ) बंद करून सामान्य जनतेला पाचशे रुपयाचा मुद्रांक ( बॉण्ड ) घ्यावा लागणार आहे.या मुळे पुन्हा सामान्य माणूस खिशाला झळ पोहचणार असल्याचे दिसून येत आहे.तर मुख्यमंत्री लाडकी बहीण या लोकप्रिय योजनेवर केलेला खर्च पाचशे रुपयांच्या वाढीव मुद्रांकावर सरकार जमा करून घेणार असल्यामुळे सामान्यांना फारच मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ पोचणार आहे.
या पूर्वीच्या राज्य सरकारने पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये या मुद्रांकात दुप्पट वाढ केली होती परंतु महायुतीच्या सरकारने ही वाढ चार पटीने केल्यामुळे आता सामान्यांना शंभर ऐवजी पाचशे रुपयांचा मुद्रांक घ्यावा लागणार आहे तसेच राज्य मंत्रिमंडळाने कार्यालयात द्याव्या लागणाऱ्या मुद्रांकांना सूट दिली असली तरीही प्राचार्य, अधिकारी आणि कर्मचारी हे आपल्यावर जबाबदारी नको हा उद्देश ठेवून जसा शंभर रुपयाचा मुद्रांक मागवतात त्याचप्रमाणे त्यांनी पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची मागणी केल्यास विद्यार्थ्यासह सामान्य जनता आर्थिक अडचणीत येणार असल्याचे अनेक पक्षकारांनी बोलून दाखवले आहे. पाचशे रुपये ऐवजी दोनशे रुपयाचा मुद्रांक घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घ्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे राज्य सरकार यावर काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “आता शंभर ऐवजी पाचशे रुपयांचा बॉण्ड घ्यावा लागणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामान्य जनतेला झळ पोहचणार ? उमरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!