वणी येथे 12 नोव्हेंबर 2022 रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन.

youtube

वणी येथे 12 नोव्हेंबर 2022 रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन

वणी –
अनंत श्री विभूषित जगद्गुरुश्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा व प्रवचन सोहळ्याचे आयोजन वणी जिल्हा यवतमाळ पूर्व येथे दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोज शनिवार सकाळी 10 : 00 वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा वणी शहरातील एच.बी.लॉन, लोकमान्य टिळक महाविद्यालय ( L.T.) कॉलेजच्या मागे, वणी शहर, तालुका वनी जिल्हा यवतमाळ पूर्व येथे करण्यात आले आहे. अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ शेगावचे पीठ प्रमुख कुंडलिकराव वायभासे साहेब , पीठ सहप्रमुख देवेंद्र दलाल साहेब ,पीठ व्यवस्थापक सुरेश मोरे साहेब, जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे, पीठ जनगणना योजना प्रमुख टेंभेकर साहेब, जिल्हा पालकत्व गोंदाने साहेब, जिल्हाध्यक्ष सचिन वानखडे , जिल्हा महिला अध्यक्षा दुर्गाताई मेघरे , जिल्हा सचिव प्रभाकर लाकडे,वनी तालुकाध्यक्ष शंकर घोगरे यांनी दिली
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान तर्फे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मरणोत्तर देहदान, रक्तदान शिबिर , आदिवासी पाड्यातील गरीब मुलांसाठी मोफत ड्रायव्हिंग स्कूल, गोरगरिबांच्या मुलासाठी नाणीज येथे इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, मोफत रुग्णालय,राज्यातील पाच हायवे वरती 24 तास विनामूल्य अंबुलन्स सेवा अविरतपणे चालू असते, महापुर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वरूप संप्रदाय समाजाच्या हितासाठी व मदतीसाठी सतत अग्रेसर असतो. अनेक समाज उपयोगी उपक्रम स्व स्वरूप संप्रदायातर्फे राबविले जातात.
यानिमित्ताने शहरातून जगद्गुरुश्रीच्या पादुकांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे देखावे यांचे सादरीकरण होणार आहे. जगद्गुरुश्रींच्या पादुकांचे सभा मंडपामध्ये आगमन झाल्यानंतर विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत .त्यामध्ये गुरुपूजन, उपासक दीक्षा ,आरती सोहळा , जगद्गुरुश्रींचे पादुका आगमन,अमृततुल्य असे प्रवचन , दर्शन सोहळा पुष्पवृष्टी तसेच मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते सामाजिक उपक्रमा अंतर्गत समाजातील गरजवंतांना मोफत साहित्याचे वाटप आदी भरगच्च कार्यक्रम दिवसभरामध्ये संपन्न होणार आहेत. याप्रसंगी उपस्थित भक्तगणांसाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी ,तालुका सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, संतसंग सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय हिंदू संग्राम सैनिक ,युवा सेना ,महिला सेना ,आरती सेवा केंद्राचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिष्य साधक,भक्तगण , हितचिंतक,कार्यकर्ते यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून या नयनरम्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीठ प्रमुख,पीठ सहप्रमुख,पिठ व्यवस्थापक ,जिल्हा निरीक्षक ,जिल्हाध्यक्ष , हिंदू संग्राम सेना, महीला सेना, युवा सेना,ज.न.म.प्रवचनकार,गुरुसेवक सर्वच माजी पदाधिकारी,सर्व पिठ योजना प्रमुख, सर्व तालुकाध्यक्ष , जिल्हा समिती, तालुका समिती, सेवा केंद्र समिती,आरती केंद्र समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

गोविंद उपासे ,निरीक्षक
जिल्हा समिती यवतमाळ पूर्व

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!