कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी उमरखेड येथे पोलिसांचा रुटमार्च उमरखेड
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी उमरखेड येथे पोलिसांचा रुटमार्च
उमरखेड
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने रविवारी शहरात भव्य रूट मार्च काढला. येत्या २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने नागरिकांना निर्भय वातावरण मिळावे याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला.
या रूटमार्च दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी नागरिकांशी संवाद साधत महत्त्वाचे आवाहन केले. “निवडणूक कालावधीत कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांकडे अतिरिक्त फौज उपलब्ध असून, प्रत्येक प्रभागात सुरक्षा बळकावण्यात आली आहे. शांती आणि सुव्यवस्था राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
मतदारांनी निर्भयपणे घराबाहेर पडून शंभर टक्के मतदान करून लोकशाही अधिकाधिक सबळ करावी,” असे उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड म्हणाले यावेळी शहरातील आठवडी बाजार शिवाजी वार्ड, ताजपुरावार्ड, नाग
मतदारांनी शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करा कोतचाही दबाव खाली न येता असे सांगितले : उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच
चौक, संजय गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक या सर्व ठिकाणांतून मार्गक्रम करत पोलिसांनी जागरूकता संदेश देत शिस्तबद्ध रूटमार्च काढला. शेवटी पोलीस स्टेशन उमरखेड येथे रूट मार्चचा समारोप करण्यात आला.
रूटमार्च दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून के पोलिसांना सहकार्य केले. निवडणूक ल शांततेत, सुरक्षिततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी व पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



