शांतता कमिटिचि बैठक संपन्न उमरखेड

youtube

शांतता कमिटीची बैठक संपन्न उमरखेड

उमरखेड …
येथे राजस्थानी भवन येथे शांतता कमिटीची बैठक ठेवण्यात आली होती ही बैठक रात्री आठ वाजता सुरू झाली
सर्व विविध क्षेत्रातील नागरिकांना व शांतता कमिटीच्या सदस्यांनी आमंत्रित करून त्रिपुरा राज्यात घडलेल्या हिंसाचाराबद्दल कृत्याबद्दल जे काही अफवा प्रसार माध्यमातून आली आणि महाराष्ट्रात त्याचे पडसाद अमरावती ,नांदेड ,मालेगाव अकोला ,संवेदनशील नवे अति संवेदनशील अशा माझ्या उमरखेड शहरात छोटी पिनही पडण्याचा आवाज नाही आला. तसेच महागाव, उमरखेड तालुक्यातील शांतता कमिटी सदस्य व नागरिकांची कौतुक केले व कुठल्या प्रकारचे जातीय सलोखा निर्माण न होऊ देणे, याबद्दल पोलीस अधीक्षक डॉक्टर भुजबळ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले. प्रास्ताविक उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी केले .इनायत उल्हा जनाब यांनी असे सांगितले आपापसात मतभेद दूर करून एकनिष्ठ राहू, माजी सैनिकांना शांतता बैठकीमध्ये समाविष्ट करावे असे माजी सैनिक विवेक मुंडे सागितले,शांतता कमिटी समितीची पुनरचना व्हायला पाहिजे असे अमोल तुपेकर यांनी मनले, बैठकीमध्ये प्रत्येकांनी आपआपल्या सूचना देऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य केले. प्रमुख मार्गदर्शक अमोल शेंडगे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सर्वांचे आभार मानले सोशल मीडियावर वायरल पोस्ट वर विश्वास ठेवू नका ,पोस्ट तपासून पहात जा ज्यांनी पाठवले त्याला विचारा तो समोरच्याला विचारेल अशा साखळीने तो व्यक्ती आपणास मिळू शकतो. त्यावर कडक कारवाई लवकर होईल, प्रमुख डॉ. दिलीप  पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, डाँ. व्यंकट राठोड उपविभागीय अधिकारी यांनी असे म्हटले अफवा वर विश्वास नका करू तंत्रज्ञान हे मानवनिर्मित आहे मी जिथे होतो तिथे एकही दंगल झाली नाही. तसेच तहसीलदार आनंद देवगावकर ,चारुदत इंगोले दराटी ,महागाव ,पोफळी येथील सर्व पोलीस अधीक्षक व पोलीस कर्मचारी बंधू ,नंदकिशोर अग्रवाल, राजू भैय्या जयस्वाल,जहीर भाई, माजी आ. खडसे रविकांत रूडे.डेव्हिड शहाणे , क्षेत्रातील राजकीय, प्रशासकीय सामाजिक व शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार बंधु व भगिनी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!