उमरखेड पोलीस विभागाच्या वतीने राम जन्मोत्सव समितीचे सत्कार

उमरखेड पोलीस विभागाच्या वतीने राम जन्मोत्सव समितीचे सत्कार
उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने कौतुकाची थाप
प्रतिनिधी । उमरखेड :
आयोध्यापती प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव दि 6 एप्रिल रोजी रामजन्मोत्सव समितीच्या वतीने मोठ्या थाटात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पाडल्याबद्दल दि 11 रोजी येथील पोलीस स्टेशन येथे पोलीस विभागाच्या वतीने श्रीराम मित्र मंडळ जन्मोत्सव समिती व सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती तसेच शिवप्रतिष्ठान समितीच्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे सत्कार करून सन्मानित करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड हे होते तर प्रमुख उपस्थितीत माजी आमदार विजय खडसे , भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची उपस्थिती होती .
अध्यक्षस्थानावरून बोलतांना हनुमंत गायकवाड म्हणाले की , मागील काही वर्षांपूर्वी उमरखेड शहराला लागलेले गालबोट पुसून काढण्याचं काम या तिन्ही उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले तसेच 2025 ची रामजन्मोत्सव मिरवणूक ही डोळ्याचे पारणे फेडणारी होती व पुढे बोलताना सांगितले जगात हिंदू धर्म म्हणजे श्रेष्ठ धर्म मानला जातो जर या धर्माचे योग्यरित्या पालन केले तर पोलिसांची आवश्यकता राहणार नाही असेही गायकवाड यांनी सांगितले .
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी या गुणगौरव सत्कार समारंभात आपले विचार व्यक्त करताना म्हणाले या तीनही जन्मोत्सव समितीने केलेले कौतुकास्पद कार्य त्याचे फलित म्हणजेच एक पाठीवर शाब्बासकीची थाप म्हणून पोलीस विभागाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आले आहे .तसेच यापुढेही येणारे सण उत्सव आनंदाने साजरे करू असे सर्वांच्या वतीने आश्वासनही दिले .
दि 6 एप्रिल रोजी या रामनवमी जन्मोत्सव सोहळा पार पडलेल्या उत्सव समितीच्या पदाधिकारी व सदस्यांच्या पाठीवर एक शाब्बासकीची थाप म्हणून येणाऱ्या सण उत्सव समितीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याकरिता पोलीस विभागाच्या वतीने गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात श्रीराम मित्र मंडळ जन्मोत्सव समिती , सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती व शिवप्रतिष्ठान समिती च्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सत्कार करण्यात आले यावेळी श्रीराम मित्र मंडळ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष श्री उल्लंगवार व सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष महेश आलट ,शिवप्रतिष्ठान समितीचे छोटू उदावंत , श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट संजय जाधव ,रमेश चव्हाण ,भैय्या पवार ,दामोदर इंगोले, सिद्धू जगताप ,सुरेश वैष्णव ,कालू कलोसे ,एडवोकेट अजय पाईकराव , सुनिल टाक यासह सर्व रामजन्मोत्सव समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार शंकर पांचाळ यांनी केले तर संचलन सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांनी केले व आभार गोपनीय शाखेचे संतोष राठोड यांनी मांडले .